पान:मधुमक्षिका.pdf/२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १३ )


षयीं जितकें सांगावें तितकें थोडेंच. ते गुण म नुष्यानें स्वबुद्धिचातुर्ये करून जाणावे, आणि आपले काम लावावे, एवढे मात्र त्याजकडे सोंपिलें आहे; व त्यासाठी त्यानें त्यांस विचारशक्ति दिली आहे. ति- · च्या साह्यानें त्यानें स्वहित साधून घ्यावें. वाफेनें मोठ्या जोराची कामे करावीं; विजेनें बातमी पोचवावी; समुद्रानें तक्ते कापावे; वायूनेंदळावें; तेलावातीवांचून नुसत्या धुराचा दिवा लागावा; इत्यादि गोष्टी पदार्थांचे धर्म मनुष्यास कळून आल्यानें घडल्या, व अशा आणखीही घडत आहेत. तेव्हां, कोणत्या वस्तूमध्ये काय गुण. आहे, व तो मनुष्यास समजल्यावर त्यापासून कोणतीं सुखें प्राप्त होतील, ह्याचा अजमास करील, असा चतुर कोण आहे ?
 आज हजारों वर्षे मनुष्ये पदार्थांच्या धर्मांचा शोध करीत आहेत. तरी, जिचेविषयीं आतां कांहीं एक कळावयाचे राहिले नाहीं, अशी एक देखील वस्तु ह्या पृथ्वीच्या पाठीवर सांपडायाची नाहीं. दररोज नव्यानव्या वस्तु सांपडत चालल्या आहेत, व जुन्या वस्तूंमध्यें चमत्कारिक चमत्कारिक गुण दृष्टीस पडता• हेत. ह्यावरून, ह्या सृष्टीमध्ये कोठे काय आहे, व कोणत्या पदार्थांत केव्हा कसा गुण आढळेल, ह्याचा कांहीं निश्चय करता येत नाहीं. परमेश्वराची करणी अगाध आहे. त्यानें कोठें काय करून ठेविलें आहे, ह्याचा कोणास अंत लागापाचा नाहीं. प्राप्त झालेल्या अल्प ज्ञानाविषयों कितीएक मनुष्पे मोठा गर्व वाहातात, व इतर प्राण्यांस अगदीं तुच्छ मानितात.