पान:मधुमक्षिका.pdf/२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १२ )


इत्यादि हिंस्र पशूंचें उपजीवन वनस्पतींच्या फळांमुळांवर चालापाजोगें नाहीं; त्यांस मांस अवश्य पाहिजे; ह्मणून त्यां- स अद्भुत शक्ति व भयंकर नखे आणि अक्राळ विक्राळ दांत दिले आहेत. हवसी देशांत पर्जन्य मुळींच नाहीं, तेथें नैल नदीस यथाकाल पूर येऊन धान्य पिकावें, अशी योजना करून ठेविली आहे.लापलंद देशामध्यें थंडी अतिशयित; ह्मणून तेथें गायी, ह्मशी, बैल, घोडे, व धान्यें हीं अगदीं नाहींत; ह्यास्तव, रेनदी- र नामक प्राण्यांची जात देवानें तेथें उत्पन्न करून ठेविली आहे; तिच्या योगानें लापलंद येथील लोकांस सर्व कांहीं निर्वाहाच्या वस्तु प्राप्त होतात; त्यांचे कांहीं एक अडत नाहीं. फार लांब जाणें कशास पाहिजे. लहान मूल उपजतें, तेव्हां त्यास अनादिकाचा कोण. ताच रस पचण्यासारखा नसतो, ह्मणून जगदीश्वरानें, त्याच्या मातेच्या स्तनांत त्याचेसाठी दूध उत्पन्न व्हावें अशी व्यवस्था करून ठेविली आहे. ह्या वरून, तो आपणां प्राण्यांविषयीं किती कनवाळू आहे, हें स्पष्ट लक्षांत येतें. ज्याची कांहीं एक सोय देवानें करून ठेवि ली नाहीं, असा एकही जीव ह्या सृष्टींत सांपडणें क- ठीण. आतां, असें मात्र कधीकधीं घडतें कीं, त्याची योजना अतर्क्य असल्यामुळे ती आपल्या लक्षांत येत नाहीं, तेणें करून, देव दीनाची उपेक्षा करितो, असें आपले तोडांतून प्रसंगोपात निघते.
 सृष्टीमध्यें मनुष्प हा ईश्वराच्या कृपेंतला प्राणी आहे. त्याच्या सुखार्थ त्याने एकेका पदार्थामध्ये असे असे चम त्कारिक व उपयोगी गुण ठेविले आहेत कीं, त्यांवि-