पान:मधुमक्षिका.pdf/२२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २१२ )

ह्मणजे ज्ञान सहज वाढते. अंधेरामध्ये एकटा अस- तांही, आपल्या मनोवृत्ति कशा आहेत, त्या कोण- त्या प्रसंगीं कशा उद्भवतात, त्यांचे परिणाम काय, ज- न्मास येऊन आपण केलें काय आणि करावे काय, इत्यादि अनेक चित्तवेधक विषयांवर प्रत्येकाने आपल्या अंतःकरणापाशीं संवाद करावा.तेणेंकरून जो आनंद होतो, तो अवर्णनीय आहे.मंडळींत जना - सत्कृत्यें, दुष्कृत्यें, चे गुण, दोष, स्वभाव, वासना, आणि आचरणें हीं पाहून, त्यांपासून आपणास उप. योगीं पडण्यासारखा बोध प्राप्त करून घ्यावा. ईश्वरा. विषयींचें ज्ञान तर सर्वोत्तम, व सर्वोपयोगी आहे. त्या. चे खालोखाल उपयुक्त लटलें ह्मणजे मानवस्वभावाचे ज्ञान होय; तें केवळ विचारशील अवलोकनानें मात्र प्राप्त व्हावयाचें.
 तुह्मी शहरांत असतां तेव्हां मनुष्याच्या कलाकौ - शल्यांचे पदार्थ पाहून जसें तुमचें मन रमतें, त्याप्रमा- णें बाहेर रानांत असतां तेव्हां पृथ्वी, आकाश, वनस्प ति, पशुपक्षी, इत्यादि अनेकविध सृष्ट पदार्थांत ईश्वराचें जे अद्भुत चातुर्य दिसतें तें मनांत आणा ह्मणजे तुह्मांला परम आश्चर्य व आनंद झाल्यावांचून राहणार नाहीं. तसेंच, ह्या दोनही प्रकारच्या वस्तूंची तुलना करून पाहिल्यानें, मनुष्यास अनुभवजन्य ज्ञानापासून किती सुख झालें आहे, व कार्लेकरून तें किती वाढेल; मनुष्याच्या व जगदीश्वराच्या करणत किती अंतर आहे; देव किती थोर आहे; व मनुष्य किती हलका आहे; ह्या गोष्टी लक्षांत येऊन तुझांला