पान:मधुमक्षिका.pdf/२२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २११ )

 इतक्या गोष्टी सांगितल्या, तरी आणखीं पुष्कळ राहिल्या आहेत. परंतु लेखाची इयत्ता भरली, ह्मणून संपविणे भाग पडते. वर सांगितल्या सर्व रीति लक्षांत ठेवून मनुष्यानें वागावें. लोकांनीं आपणाशीं ज्या रीतीनें वागावें, असें आपण इच्छितों, त्या रीतीनें- च आपण त्यांशीं वागावें. खरें बोलावें; सदाचरण करावें; कोणास दुखवू नये; आपल्या देशाचें हित शोधावें; आणि ऐहिक पसारा व्यर्थ समजून, एकांतीं एकाग्र चित्तानें जगत्कर्त्या विश्वंभराला अनन्यभावें करून शरण जावें, आणि त्यापाशीं सुबुद्धि व पातका• ची क्षमा मागावी; आणि शेवटीं ईश्वरीं एक भाव ठेवून प्राण सोडावा. हेंच जन्माचें सार्थक्य होय


ज्ञानसंपादन.
श्लोक.

जो ज्ञानहीन नर तो पशुतुल्यजाणा, ऐसा सदर्थ कैवि सांगतसे शहाणा ;
तो सत्य सत्य, लवलेश न त्यांत खोदें,
ध्यानीं धरा हित घडेल तुह्मांस मोठें ॥ १ ॥

आपले ज्ञान वाढविणें हें आपलें मोठें कर्तव्य आहे, असें सर्वदा सर्वांनीं लक्षांत ठेवावें. बसतां, उठतां, काम करतां, देतां, घेतां, बोलतां, चालतां, खातां, पितां, घरांत किंवा बाहेर, विचार करण्यास प्रतिबंध होत नाहीं, आणि विचार चाललेला असला


१ भर्तृहरी.