पान:मधुमक्षिका.pdf/२२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २१० )

असला ह्मणजे तो निरोगी, निकोप शरीराचा, दुल- दुलित; तोच गरीब असला ह्मणजे लाटण्या, लट्टेश्वर, दंडोक्या. ह्या प्रमाणे सर्व समजावें. सध्याचे काळीं पैशाला जसा मान आहे, तसा कशासही नाहीं. वित्ता- पेक्षां विद्या श्रेष्ठ, असें लोक तोंडाने बोलतात मात्र. त्याप्रमाणें ते खरोखर मानीत नाहींत. ह्याचीं उदाह रणें देणें नकोत. कारण, ती हरहमेषा जनांत दिसून येतात. ह्याचें कारण उघड आहे. तें हें कीं, श्रीमाना- च्या द्रव्यापासून लोकांस जितका तात्काल उपयोग होतो, तितका विद्वानाच्या विद्येपासून होत नाहीं. ह्यास्तव विद्या प्राप्त करून घेण्यासाठीं एकाद्यानें आपलें सगळे द्रव्य खर्चून बसावें हें योग्य नाहीं. सुख हो- ण्यास वित्त आणि विद्या हीं दोन्ही पाहिजेत.
 सामान्यदृष्टीने पाहिलें असतां, आपणावर पुष्कळ लोक प्रीति करतात, असें मनुष्यास वाटतें; परंतु, ती भ्रांति आहे. कितीएक जन स्वहित साधण्यासाठी दुस- याची हांजीहांजी करितात, व कितीएक जन आपलें नुकसान न व्हावें, ह्मणून त्याची मर्जी धरितात. परंतु, खरा मित्र असा थोडा. प्रसंगी उपयोगी पडणारा असा फार विरळा. हें मनुष्यास अनुभवांती कळते. आधीं खरें वाटत नाहीं. ह्यास्तव शाहण्याने पहिल्यापासून सावध राहावें. फारसे लोकांच्या भिस्तीवर जाऊ नये. जी वस्तु आपणापाशीं नाहीं, ती आपल्याला कोणी द्यावयाचा नाहीं. तीच आपले जवळ असली, ह्मणजे तोंड हालविल्याबरोबर सर्व आपापली पुढे करितात. ' ही गोष्ट साधारण द्रव्यास लावून पाहा.