पान:मधुमक्षिका.pdf/२१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २०९ )

फार थोडे मिळतात; आणि कधीं कधीं त्याचें नुकसान- ही होतें. ह्या गोष्टी हरहमेष दृष्टीस पडतात. ह्यामु- ळें लुब्रे लोक प्रसंग पडेल त्याप्रमाणे बऱ्यास वाईट व वाइटास बरें ह्मणून, ग्राह्माग्राह्य विचार न पाहतां आप- ली वेळ साधितात. परंतु, जे नीतिदेवतेचे निस्सीम भक्त आहेत, ते हरएक दुःख सोशितात, पण आपला बाणा सोडीत नाहींत.
 दुसऱ्याचे दोष बाहेर काढण्याची व त्यांबद्दल त्या- ला शासन करण्याची जितकी मनुष्याला हौस आहे, तितकी त्याच्या गुणांबद्दल त्यास बक्षीस देण्याची इच्छा नाहीं. पाहा. चोरी, चाहाडी, व्यभि- चार, इत्यादि अनेक दुर्गुणांपासून तुझीं जन्मभर दूर राहिलां, आणि एक दिवस चुकून कोठें तुमचें वांकडें पाऊल पडलें, ह्मणजे पुरे; लोक तुमची तेवढ्याबद्दल अप्रतिष्ठा करण्याला चुकणार नाहींत. तात्पर्य, जन हे दोष दृष्टि आहेत, गुण दृष्टि नाहींत. नीति व सदाचरण ह्यांचेच केवळ अनुसरण मी करीन, जनरी - तीनें वर्तणार नाहीं, असें जर कोणी ह्मणेल, तर त्याचें लोकांत चालावयाचें नाहीं. ह्मणजे असें कीं, जो कोणी तसा वर्तेल, त्यास व्यवहार करतां येणार नाहीं. कारण, सर्व जनच तसे बनले आहेत.
 जन हे पैशाचे आहेत. ज्यापाशीं द्रव्य, त्याला ते भजतात. गरीब आणि श्रीमंत ह्यांच्या संबंधानें एकच क्रियेस त्यांनीं वेगवेगळीं नांवें दिली आहेत. पुष्कळ -खाणारा श्रीमान असला ह्मणजे तो भोक्ता, गरीब असला ह्मणजे खादाड. शरीरसंपत्ति संपन्न श्रीमंत