पान:मधुमक्षिका.pdf/२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ११ )


इतका शोध विद्वज्जनांनी बुद्धिचातुर्ये करून लावि- ला आहे; आणि तो ते सप्रमाण खरा करून दाखवितात, त्यावेळेस आपण निरुत्तर होतों. परंतु, ह्या ग्रहमंड- ळाची नुसती कल्पना तरी आपणास करवते काय ? के- बढा हा अवाढव्य विस्तार. ! तरी ही एका सूर्याची गोष्ट झाली. विद्वान् लोक आणखी असें ह्मणतात कीं, जी जी चांदणी आपल्या दष्टीस पडते, तो तो एक एक सूर्य असून, त्याला त्याची वेगळी ग्रहमालाही असण्या चा संभव आहे. हें ऐकिलें ह्मणजे तर बुद्धि चकित होऊन जाते; व कांहींच तर्क चालत नाहीं.धन्य त्या सर्वशक्तिमान् कारागिराची. ! हे राजाधिराजा, ह्या महा पसायापुढे तुझ मोठमोठीं राष्ट्रे, बाडे, बागा, व इतर संपत्ति ह्यांचा काय पाड. ? सामान्य मनुष्या, तूं तर आपल्या शेताभातांची, घरवाड्यांची, व तूटपुंजीच्या पै शाची गोष्ट देखील काढूं नको व त्यांविषयी काडीमात्र गर्वही वाहूं नको.

परमेश्वरानें एवढ़ें अकटोविकट विश्व रचिलें आहे, पण त्यांत अव्यवस्था, अथवा कांहीं चूक राहिली आहे काय ? एका रती इतकी देखील नाहीं. जें जें पाहावें, त्यांत त्याचें अपार चातुर्य दिसून येतें. त्यानें जीं यंत्रे एकदा लावून ठेविली आहेत, तीं कधीं बिघडत नाहीत; सूर्य व चंद्र ह्यांचे उदयास्त, ग्रहणें, ऋतु, हीं कधीं आगे मागें होत नाहींत.
 ह्या सृष्टीतल्या प्राण्यांच्या पोषणाविषयोंही जी त्यानें तजवीज लावून ठोवेली आहे, ती लक्षांत आणिली असतां, व्याच्या दयालुत्वाविषयी आपली खातरी होते. व्याघ, सिंह,