पान:मधुमक्षिका.pdf/२१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २०८ )
जन.

 ह्या संसारांतील पुष्कळ कामे करावयाचीं फार कठीण आहेत. त्यांत जनांकडून चांगलें ह्मणून घेण्याइतकें कोणतेंच कठीण नसेल.पाहा, जन कसे आहेत ते. ! आजपावेतों ह्या पृथ्वींत अनेक सज्जन होऊन गेले; पण त्यांत ज्याची कधीं कोणी निंदा केली नाहीं, असा एक तरी सांपडेल काय ? तुझी पाहिजे तितके कां जपून वागांना; यच्च यावत् मनुष्यें तुह्मांला वाखाणितील, असें कधीं घडणार नाहीं. कोणी- ना कोणी तरी तुमची निंदा करणारा निघेल. श्रीमं- ताचा खर्च बाताबेताचा असला ह्मणजे कृपण, करंटा, रक्षक, भोगील कोणाचें, सराफ, असें ह्मणावें; तो खूप पैसा उडवून चैन करीत असला, ह्मणजे त्याला दिवा- ळखोर, भगली, बाजीराव, अशीं नांवे ठेवावीं; अशी प्रत्येक गोष्टींत जनाची चमत्कारिक रीति आहे.
 आणखी जनांचा स्वभाव असा आहे कीं, कसेंही असले, तरी, जें प्रिय तें चांगलें, आणि जें अप्रिय तें वाई- ट, असें त्यांस वाटतें. ह्यटलें असतां जें चांगलें तें प्रिय, आणि जें वाईट तें अप्रिय, असें असावें, पण तसें नाहीं. ह्यामुळें जें खरोखर स्वभावतःच वाईट, त्यास चांगलें ह्मणून त्याचें ग्रहण करावें लागतें; आणि जें खरोखर स्वभावतःच चांगलें, तें वाईट ह्मणून कधीं कधीं झिट- कारणें प्राप्त पडतें, ही मोठी दुःखाची गोष्ट होय. जनांमध्ये सध्या दुर्गुणांची वृद्धि होत चालली आहे; ती जर एकाद्यास न रुचली, आणि जर तो तिला अनुकूल न झाला, तर, त्याच्या विरुद्धपक्षाचा समाज मोठा असल्याकारणानें, तो मूर्ख ठरतो; त्याला मित्र