पान:मधुमक्षिका.pdf/२१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २०७ )

कोणी नाकबूल करणार नाहीं. ह्यावरून, मनुष्याच्या मनोवृत्ति मरणभीतीस जिंकतात, हें सिद्ध झालें. मनुष्य मरण्यास सिद्ध होतो, तो जीवास कंटाळतो ह्मणून होतो, मृत्यूस तो भीत नाहीं ह्मणून होतो, असें नाहीं. प्राण जाण्याच्या पळापावेतों मनुष्याचा स्वभाव बदलत नाहीं. ह्याविषयीं औरंगजेब बादशा- हाची गोष्ट साद्यंत वाचिली असतां खातरी होईल. मरण ही एक परमेश्वराची देणगी आहे, असें समजून मरतो तो मोठा पुण्यवान ह्मणावा. जनन आणि मरण हृीं परमेश्वराधीन आहेत. आणि तीं दोन्ही परम दुःखप्रद आहेत. तीं सोसल्यावांचून जीवांस अन् गति नाहीं.
 मृत्यूविषयीं निरंतर सूक्ष्म विचार करीत गेलें अस- तां, त्यांची भीति नाहींशी होते. आपलें जें कांहीं आयुष्य गेलें, तें सारें स्वप्नवत् आहे; आणि पुढे जें राहिलें आहे त्यावर भरवसा ठेवणें, ह्मणजे खपुष्पाची आशा करणें आहे; फक्त चालली आहे घडी ती आप- ली. असें समजून, हे मानवा, आपले आयुष्याचा एक क्षणही व्यर्थ घालवूं नको. विचार कर.

श्लोक.

बा अंतकाळ तुज येइल जाण जेव्हां, होतील व्यर्थ सगळे हि उपाय तेव्हां; जाणें पडेल बहु सोडूनि हा पसारा, सत्कारणी खरच ह्यास्तव काळ सारा. ॥