पान:मधुमक्षिका.pdf/२१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २०६ )

कल्पना मनुष्यांनीं मनांत आणावी. तथापि, करांगु- ळी चिवळिल्याच्या दुःखाइतकेंही दुःख न होतां मनु- ष्यें प्राण सोडितात, अशीं कितीएक उदाहरणें घडून येतात. सेनिका ह्मणून एक मोठा रोमन विद्वान होऊन गेला. तो ह्मणत असे की " स्वतः मृत्यूपेक्षां प्रेतसंस्कार फार भयंकर आहे." सत्य आहे.मध्यें शव पडलें आहे, आणि त्याच्या सभोंवतीं माणसें बसून दुःखाचा आक्रोश करीत आहेत, असे दृष्टीस पडल्या- ने मृत्यूचें फार भय वाटतें. तथापि हाही चमत्कार खरा आहे कीं, मनुष्याच्या कितीएक मनोवृत्ति मरणाच्या भीतीस देखील गुंडाळून एकीकडे ठेवितात.पाहा.सूड उगविण्याचा दृढ निश्चय मरणास मोजीत नाहीं. ह्याचें उदाहरण ह्याच पुस्तकांत अग्वायराच्या हकीक- तीवरून दिसून येतें. ममतापाशानें मरणाचें कांहीं वाटत नाहीं. ह्याचीं उदाहरणें, आई मुलासाठीं जिवावर उदार होते, चांफाजी टिळेकर नारायणरावाचे आंगावर पडून मेला, इत्यादि अनेक देतां येतील. कीर्तीच्या लोभापुढें मरणाची परवा वाटत नाहीं. ह्याचीं पुष्कळ उदाहरणें रजपूत लोकांच्या गोष्टींत आढळतात. आतां आपणांस अतिशयित दुःख होणार, असे वाटलें ह्मणजे मनुष्ये मृत्यूचा आश्रय करितात; पतिमरणानंतर स्त्रियांवर वैधव्यप्रसंग आल्यामुळे त्यांनी प्राणनाश करून घेतल्याच्या अनेक गोष्टी लोकांत प्रसिद्ध आहेत. अब्रूची चाड ही मरण भीती. स खाते; दिवाळे वाजण्याचा प्रसंग आल्यामुळे अनेक सावकारांनी विष खाऊन मान सोडिले आहेत, है