पान:मधुमक्षिका.pdf/२१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २०५ )

असा भरंवसा धरावा. अहोरात्र चांगला उद्योग करावा; ईश्वरावर भाव ठेवावा; त्याची नित्य एकाग्रचित्तानें प्रार्थना करावी; त्यापाशीं आपल्या पापांची क्षमा मागा- वी; आणि त्याच्या आज्ञा पाळाव्या.
 ह्याप्रमाणें वागल्यावर कोणाही गरीबास गरीबी दु:- सह होणार नाहीं. त्याला लोक मदत करतील. आणि उद्योगाचे बळानें कदाचित् तो गरीबीपासून लवकर मुक्तही होईल.


मृत्यू.

 लहान मुलें स्वभावतःच अंधेरांत जाण्यास भितात, आणि ज्याप्रमाणें त्यांचें तें भय नानाप्रकारच्या बाऊं- च्या गोष्टींनी वाढतें, त्याचप्रमाणे मृत्यूविषयीं मोठ- मोठ्या मनुष्यांची गोष्ट आहे.ह्मणजे, मरणाचें भय त्यांचे मनांत पूर्वीचें असतेंच.परंतु, तें प्रेतसंस्कार पाहिल्यानें व तद्विषयीं पुष्कळ गोष्टी केल्यानें व ऐकल्यानें वृद्धि पावतें. मरण हें स्वपातकाचें फळ व मरणा वृद्परलोकीं जाण्याचें द्वार आहे, हा विचार पवित्र आणि धर्मनिष्ठास योग्य होय. सृष्टिक्रम आहे तदनुरूप मरावयाचें अवश्य आहे तर, मग तें मनांत आणून त्यापासून भय पावणे, हें फार वाईट आहे. च्या दुःखाची कल्पना मनांत आणून देण्यासाठीं, कोणी एक पुरुष असें ह्मणतो कीं, आपलं बोट जर उगाच थोडेसे कोणीं दाविलें, तर त्यापासून आपणास ज्या वेदना होतात, त्यांवरून, सर्व शरीर नाशाप्रत पावविणारा जो मृत्यु, त्याच्या तडाख्यांच्या वेदनांची