पान:मधुमक्षिका.pdf/२१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २०४ )

विनोदाने मारून न्यावी. तसें न करितां उलट भाष- ण केल्यास, लोकांस वाईट वाटून ते प्रतिकूल होतील. मग गरीबाचें कसे चालेल. ?
 पोषाक. - गरीबांनी आपल्या मगदुराप्रमाणे वस्त्रें घेऊन तीं अगदी साध्या रीतीने पांघरावीं. त्यांत चट्टी- पट्टी बिलकूल करूं नये. कारण, तिच्या योगानें स्वभाव डौली दिसतो, तो कोणालाही आवडत नाहीं. आपण लोकांस आवडलो तरच ते आपणांस मदत देतील, हें सांगावयास नको. आणखी, आपणांस पंचा नेसण्या- सामर्थ्य असून, दैन्य दाखविण्यासाठीं जर आपण लंगोटी लावून फिरूं लागलों, तर त्यालाही लोक नांवें ठेवितील व लबाडी ह्मणतील, हें गरीबांनी लक्षांत ठेवू- न वागावें.
 खाणेपिणे.-गरीबांनीं आपलें खाणेपिणे फार माफक ठेवावे. 'असेल तेव्हां दिवाळी, आणि नसेल तेव्हां शिमगा,' असा उधळेपणा त्यांनी करूं नये; जें थोडेबहुत मिळेल तें काढून सण करूं नये. पुरवून पुरवून खावें; ऋण उंच पदार्थांवर वासना गेली, तर ती विचाराने दाबावी; आणि मनांत असा विचा- र करावा कीं, उंची पदार्थांपासून सुख काय तें ते तोंडांत आहेत तोपर्यंत; ते खाली उतरले ह्मणजे ते रुचिकर होते आणि नव्हते सारखेच.
 साधारण वागणूक.-गरीबांनी लोकांशी आंत बाहेर सारख्या रीतीनें वागावें; प्रतारणा करूं नये. कोणतें- ही काम करणें तें विचारपूर्वक करून आपणांस हिता- वह होईल तें करावें. उद्योगानें सर्व साध्य आहे,