पान:मधुमक्षिका.pdf/२१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २०३ )

लोक फार थोडे असतात. तेव्हां अर्थात मूर्ख धन- धांची वाहवा करण्यांत याचक असत्य भाषणाच्या दो- षांत पडतो. हा त्याचा एक तोटा. आणि दुसरा असा कीं, त्या खोट्या स्तुतीने ते मूर्ख धनिक फुगून स्वतःची खरी स्थिति विसरतात, लुच्चे, कार्यवाद, पैसा काढू लोक थापा देऊन त्यांस नागवितात; त्या- मुळे ते शेवटीं धुळीस मिळतात. ह्यास कांहीं अंशी खोटी स्तुति कारणीभूत होते. ह्यास्तव सुज्ञ पुरुषानें ती सर्वथा वर्जावी. जे श्रीमंत लोक गोरगरिबांस पैसा देतात, त्यांच्यामध्ये केवळ धर्मबुद्धीनें गरीबांची दया येऊन देणारे फारच थोडे; स्फीती करितां देणारे असे पुष्कळ असतात.
 निंदा - गरीबाने कोणालाही वाईट ह्मणूं नये. कोणा- च्या निंदेच्या गोष्टी त्याचे समक्ष निघाल्या, तर त्यानें त्या एके कानाने ऐकून दुसऱ्या कानानें सोडून द्या- व्या; त्यांविषयीं त्यानें अक्षर देखील बोलू नये. क कीं, त्यास लहान, मोठे, उंच, नीच, सज्जन, दुर्जन, ह्या सर्वांची गरज लागणार. आणि हें सर्व जग तर त्यांनीच भरले आहे.
सहनशीलता. - हा मोठा गुण गरीबास आवश्यक आहे. ज्याचे ठायीं  सहनशीलता नाहीं, तो दांडगा असा जनांचा समज आहे; ह्मणून त्यास साह्य करण्या- विषयीं त्यांची प्रवृत्ति होत नाहीं.आणि गरीबाला तर त्यांची क्षणक्षणी गरज. ह्यास्तव कोणी कसेही बो- लला तरी तें यानें सोसून घ्यावें. फार राग आला, तर तो बाहेर न त्याविषय मनांत दाखवितो तो वेळ