पान:मधुमक्षिका.pdf/२१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २०२ )

असें करावयाचें असतें. ह्याचा बंदोबस्त यथाकालीं न केला तर, जसें मिठाच्या एका लहानशा खड्यानें इंडाभरही दूध नासतें, तसें त्याच्या अल्प दुष्टकर्मानेंही, आपणावर लोकांनी कितीही उपकार केले, तरी ते निरुपयोगी होतात. यास्तव दुर्जनास सदां वंदून राहिलें पाहिजे.
 कर्ज. - गरीबीमध्ये कोणत्याही कामासाठी कर्ज करूं नये. कारण, 'कर्जाचिये पाठीवरीअसे असत्याची स्वारी' अशी ह्मण आहे; आणि असत्य हैं सर्व दुःखांचें मूळ आहे. कर्ज काढील त्यास कांहीं तरी दुःख झाल्यावां- चून राहणार नाहीं. एखादी हलकी देखील चाकरी. पतकरावी, अथवा वेळेस आपल्या घरची चीजवस्त असेल ती विकावी, निदान भीकही मागावी, पण दरि- द्री मनुष्याने कर्ज असे काढू नये. श्रीमंत व उत्पन्न- वाल्या पुरुषास देखील कर्जापासून मुक्त होण्याची पंचा- ईत पडते; ह्याची उदाहरणें, जाहागीरदार, जमीदार वगैरे लोकांकडे लक्ष पुरविलें असतां, पुष्कळ आढळ- तील. असें आहे, तर मग तेथें गरीब लोकांचा पाड काय. ?
 स्तुति. - गरीबानें कोणत्याही कामासाठी कोणाचीही उगीच स्तुति करूं नये.त्याने एखाद्याच्या गुणांचे खरें वर्णन केलें, तरीसुद्धां हें कांहीं तरी मागण्यासाठीं लाघव आहे, असे एकदम जनांच्या मनांत येतें. मग खोट्या स्तुतीनें त्यांस तसें वाटेल, ह्यांत कांहीं नवल नाहीं.पहा, ही चांडाळीण गरीबी फुका खरें देखील बोलूं देत नाहीं. ! जनांत खऱ्या स्तुतीस पात्र असे गुणी