पान:मधुमक्षिका.pdf/२११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २०१ )

 लाज. - मागें ह्या लोकांत मोठचा डौलानें व इत- मामानें मी वागत असें, तो आतां येथेंच अशा दीन- तेनें कसा वागूं, हा जो विचार आहे, तो गरीबी प्रा- प्त झाल्यावर मनांत आणतां कामास नये. जो प्रसंग येईल, तो कसा तरी घालविणें भाग आहे. त्यापक्षी, ज्या गोष्टींपासून आपले किंवा लोकांचे अहित होतें, त्या वर्जून, प्रसंगोपात्त, कोणतीही एकादी गोष्ट विचारपूर्वक करणे, हे अगदी योग्य आहे. अमुक कर्म निर्दोष आहे, पण तें हलके असून अझून पर्यंत कोणीं कधीं केलें नाहीं, असें वारं- बार मनांत येतें; तथापि त्यास न जुमानितां स्वहिताचें काम करण्यांत आपले पाऊल कधींही मागे घेऊ नये. आणि फारच दुःख वाटू लागले, तर असा विचार करावा कीं, आजपावेतों तशा कामास हात घालण्याचा प्रसंग आला नाहीं, ती ईश्वराची कृपा होती; व तें आतां करावें लागतें, ही त्याचीच इच्छा आहे. ह्मणून त्याविषयीं कुरकुरणें अथवा लाज धरणें, हें अगदी वेडे- पण आहे. पंचपक्वान्नी मधुर भोजन नित्य सेविणाऱ्या राजास जर ज्वर आला, तर त्यालाही काडेचिराइताचा कडू काढा घ्यावा लागतो. तात्पर्य, मनुष्य केवढा क- साही असो, त्यास आपल्या स्थितीप्रमाणे कृति बदलणें प्राप्त आहे.
 आर्जव. - गरीबीमध्ये सर्वांशीं मोठ्या आर्जवाने वा- गलें पाहिजे.त्यांत दुर्जनाशीं तर फारच. कारण, गरीबास त्यांची मर्जी संपादून, लोकांच्या नाशाविषयीं उद्युक्त असें जें त्याचें दुष्ट मन, ते आपणास न बाधे