पान:मधुमक्षिका.pdf/२१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २०० )

त्यानें आपल्या तरवारीने वार करून ठार मारिलें. तेव्हां अग्वायर ह्याचा राग शमला. हा परिणाम सूड उगविण्याचा, ! केवढा अनर्थ.
 कोणतीही वाईट वासना मनांत उद्भवल्या बरोबर तिचें उत्पाटन केलें पाहिजे. जर ती वाढू दिली, तर ती नाश केल्यावांचून कदापि राहणार नाहीं.


गरीबी.

 ह्या जगामध्यें गरीबी पुष्कळांस प्राप्त होते. पण कोणत्या रीतीने वागलें असतां तिजमध्ये आपला निभाव लागेल, हें जाणणारे फारच थोडे असतात. दारिद्र्य हें महासंकट आहे. इतर संकटांपासून- ही दुःख होतें, परंतु, ह्याच्या इतकें नाहीं. गरीबी कपाळीं आली असतां, अन्न नाहीं; वस्त्र नाहीं; कोणी नुसतें ये बस देखील ह्मणत नाहीं; अशी मनुष्याची स्थिति होते. एकाद्या महारोगी मनुष्याप्रमाणे त्याला श्रीमंतजनांपासून दूरदूर वसावें लागतें; तो कोणाचे घरीं गेला असतां, त्यास कोणी घरीं असूनही भेटत नाहीत, जणु काय भितात, अशासाठीं कीं, हा आला ह्मणजे कांहीं ना कांहीं तरी मागत. सुटणार; तो जो जो उद्योग करतो, त्यांत त्याचा पाय मागें; असे असून घरीं कुटुंब मोठे असलें, ह्मणजे त्या पापास जोडा नाहीं. देवा, मरण दे, पण ही गरीबी नको, असें व्याला होतें. सारांश, अशा अवस्थेमध्ये दिवस काढ णें फार कठीण आहे. ह्यास्तव त्याविषयीं ज्या थोड्या- शा सूचना अवश्य दिसतात, त्या लिहितों.