पान:मधुमक्षिका.pdf/२०९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १९९ )

मी मरेन तेव्हांच तें नष्ट होईल. आणि ह्यापासून सुटका लवकर व्हावी, ह्मणून मी मृत्यु येण्याविषयीं होईल तित- का प्रयत्न करीन. तुझीं कोणी माझे नादी लागूं नये.
 पुढे, इस्किव्हल हा कामावरून निघे तो पर्यंत अग्वायर हा पिरू देशांत स्वस्थ राहिला. तो कामावरून निघतांच त्यास ठार मारण्याचा निर्धार करून अग्वायर बाहेर पडला. हें वर्तमान इस्किव्हल ह्यास कळलें. तेव्हां त्याच्या भयानें लासरिज येथे साडेचारशें कोसांवर त्या- पासून दूर जाऊन राहिला. आणि इतक्या दूरच्या पल्लचावर, अग्वायर कशाचा येतो, अशा घमंडींत तो होता. इतक्यांत १५ दिवसांमध्ये अग्वायर त्या ठिकाणीं दाखल झाला. ही खबर इस्क्किव्हलास समजतांच तो तेथून निघून, सुमारे ६५० कोसांवर किंतो ह्या शहरीं येऊन राहिला. अग्वायर लासरिज येथून उघडा आणि अनवाणी निघाला. तो. थोडक्याच दिवसांत त्या शहरास आला. ह्या प्रमाणे पळ आ- णि पाठलाग एक सारखे सवातीन वर्षे चालले. तेणें करून इस्किव्हल थकला; आणि अग्वायर ह्यापासून आपले रक्षण होण्यास कोस्को शहर चांगलें, असें समजून तेथें राहिला. कारण तेथचा सुभेदार मोठा कर्जा आणि निष्पक्षपाती होता. तेथें देखील इस्क्कि- व्हल मोठया सावधगिरीनें वागत असे. तो आंग- रख्याचे आंत चिलखत घाली, व जवळ जंब्या, कट्यार, तरवार, हीं हत्यारें बाळगी. एके दिवशीं संधि साधून अग्वायर त्याचे घरांत शिरला. तो इस्क्कि- व्हल एका कोंचावर स्वस्थ निजला होता.त्यास