पान:मधुमक्षिका.pdf/२०८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १९८ )

पहिल्या हुकुमाप्रमाणे गाढवावर बसवून फटके मार-ण्यासाठीं नुकतेच बाहेर काढिलें होतें, त्यास त्यांनी पाहिलें. तेव्हां ते मोठ्या घाईनें त्याजपाशी जाऊन ओरडून ह्मणाले, “हां हां राहूद्या, राहूद्या, शिक्षा सध्या तकूब झाली आहे; हा हुकूम पाहा. " हें अग्वायरानें ऐकिलें तेव्हां तो बोलला, "गाढवावर बसण्याचा व उघड्या आंगानें जनांपुढें येण्याचा जो लाजिरवाणा संस्कार, तो ह्या देहास न घडावा, ह्मणून मी इतका धडपडत होतों. तो तर आतां होऊन चुकला. त्या- पक्षीं मला आतां ती शिक्षा सोसूंद्या. शिक्षा होण्याच्या भीतीनें ज्या वेदना मला आठ दिवसांत सोसाव्या लाग- तील, त्या, आतांच्या साक्षात् शिक्षेच्या वेदनांपेक्षां दुःसह आहेत, त्या मला नकोत. व ह्या वेळीं शिक्षा होऊन गेली, ह्मणजे माझे मित्रांस मजसाठीं आणखीं खटपट करणेही नको. आणि मला पक्के माहीत आहे की, कोणी कांहीं केलें तरी सुभेदार माझी शिक्षा तीळभर देखील कमी करीत नाहीं. मग वृथा शीण कशाला पाहिजे ?" असें ह्मणून त्यानें पाठ पुढे केली, आणि हूं- का चूं न करितां फटाफट दोनों फटके घेतले.
 नंतर अग्वायर ह्यानें सरकारची नौकरी सोडली, आणि औदासिन्य धरिलें. त्यास चिंताक्रांत पाहून त्याचे मित्र त्याला दुःख विसरण्यास नानाप्रकारचे उद्योग कर ह्मणून सांगत. तेव्हां तो ह्मणे कीं, "आतां कशाचें 'दुःखविस्मरण ? पाठीचे वण गेले, परंतु अंतःकरणास जे घाव लागले आहेत, ते बरे न होतां उलटे वृद्धि पावत आहेत. हें दुःख माझें जन्माचे सोबती झाले आहे.