पान:मधुमक्षिका.pdf/२०७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १९७ )

खोलीत दडून बसला होता. स्पानियर्द लोक आपले बोजे इंदियन लोकांच्या डोक्यांवर चढवून चालूही लागले, तरी तो प्रथमतः कांहीं बोलला नाहीं. शेवट - ची टोळी निघाली, तेव्हां त्याच्याने राहवेना. तो. खोलींतून फटकर बाहेर आला. तेव्हां अग्वायर नामक अमलदाराने दोघां इंदियनांच्या डोक्यांवर ओझीं लाद- लीं आहेत, असें त्यानें पाहिलें. तेणें करून त्याला इतका संताप आला की, त्यानें अग्वायर ह्यास एकदम कैद केलें. नंतर कांहीं दिवसांनीं त्याच्या अपराधाची चौ- कशी करून त्यास इस्किव्हल ह्याने २०० फटके मार- ण्याची शिक्षा ठरविली. अग्वायर हा मोठा माणूस होता. त्यानें आपले मित्रांकडून सुभेदारास, ही लाज आणणा- री शिक्षा रद्द करण्याविषयीं नानाप्रकारांनी सांगितलें. . सुभेदाराने तीच शिक्षा अंमलांत आणण्याविषयीं दुरा- ग्रह धरिला. तो तो कांहीं केल्यानें सोडीना, अग्वाय- राने अर्ज केला की, मला देहान्त शिक्षा सरकारानें द्यावी, ह्मणजे हें काळिमा लागलेले तोंड घेऊन जन- मध्यें मला जावयास नलगे. सुभेदार पाषाणहृदयाचा पडला; त्याला कशाची दया ? त्यानें परम क्रोधाविष्ट होऊन असा सक्त हुकूम केला कीं, फटक्यांची शिक्षा आतां, ह्या घडीस बजाविली पाहिजे. हें बाहर समज- तांच शहरचे सर्व लोक जमा झाले. त्यांनीं अग्वायराची शिक्षा कमी करण्याविषयीं, अथवा निदान सध्या त- कूब ठेविण्याविषयीं सुभेदारास विनंती केली. त्यानें शिक्षा ८ दिवस तकूब ठेवण्याविषयीं हुकूम दिला. तो घेऊन ते लोक तुरुंगाकडे गेले. तों, अग्वायर ह्यास,