पान:मधुमक्षिका.pdf/२०६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १९६ )

उलटा तोटा. आहे. तो असा कीं, आपल्या शत्रूंनीं आप- ला अपमान वगैरे करून जें कांहीं दुःख आपणास दिलें असेल, त्याची आपणास सर्वदा आठवण होते, आणि तिच्या योगानें मागील दुःखांची पुनःपुनः आवृति मात्र होते, दुसरें कांहीं नाहीं. तस्मात् सूड उगविण्याची जी आपली दुर्बुद्धि, ती नेहेमी आपण दाबीत असावें, हेंच आपणास उचित होय.
 सूड घेण्याच्या बुद्धीपासून अनेक नाश होतात. ह्यांचीं उदाहरणें ग्रंथांतरीं व लोकांच्या तोंडीं पुष्कळ आहेत. त्यांवरून आपण सावध व्हावें. ही दुर्बुद्धि जशी आपले मनांत उद्भवूं देऊं नये, तशीच ती आप- णाविषयीं दुसऱ्याचे मनांतही उत्पन्न होऊं देऊं नये. नाहीं तर आपली मोठी हानि होईल. दुसऱ्याचें वाईट आपण केलें नाहीं, आणि त्याचें वाईट व्हावें असें मनांत आणिलें नाहीं, ह्मणजे आपणाविषयीं दुष्टबुद्धि कोणीही धरणार नाहीं, हें पक्के समजावें.
 दावेदाऱ्याचा सूड उगविण्याविषयीं मनुष्याच्या मना- चा एकदां निर्धार झाला, ह्मणजे किती दुष्ट परिणाम घडतात, हें दाखविण्यासाठीं एक लहानशी गोष्ट सां- गून हा विषय समाप्त करितों.
 पोतोसीचां सुभेदार लायसेंशियादो इस्किव्हल ह्यानें एका पलटणीस तकमन राजधानीस निघून जाण्यावि- षय हुकूम केला, आणि अशी सक्त ताकीद दिली कीं, ओझी वगैरे नेण्याच्या बिगारीस इंदियन लोकांस बिल- कूल धरूं नये. आपली ताकीद नौकरलोक कशी मानितात, हें पाहण्यासाठीं इस्क्किव्हल एका लहानशा