पान:मधुमक्षिका.pdf/२०५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १९५ )

 कोणी मनुष्य सूड घेतो, तेव्हां आपल्या वैन्यास इजा व्हावी, इतकाच त्याचा सर्वदा हेतु असतो, असें नाहीं. तर त्याला दुःख सोसतांना कृतकर्माची आठ- वण होऊन, पश्चात्ताप व्हावा, असेंही त्याचे मनांत कधीं कधीं असतें. हा मनोधर्म फार चमत्कारिक आहे. अपराध्यास शिक्षा करून मनुष्याची तृप्ति होत नाहीं; तर ती शिक्षा, जे दुःख तूं मला दिलें त्याबद्दल- ची आहे, असे शत्रूस कळविण्याने त्याला फार समा- धान होतें. हैं एक प्रकारें बरें. परंतु भितरे सूड उगविणारे लोक जे आंतमाऱ्याने दुःख देतात, ते परम दुष्ट होत. बाहेरून स्नेहभाव दाखवून घात करणारे जे चांडाळ, त्यांचें मुखावलोकनही करूं नये; व अशां- च्या अपराधांची कधीं क्षमाही करूं नये. शत्रूस क्षमा करावी, असें नीतिशास्त्राचे आग्रहपूर्वक ह्मणणे आहे; परंतु मित्रास क्षमा करावी, असें वचन कोठें आढळत नाहीं. कांकीं, क्षमेस पात्र अपराध कोणता ? बुद्धचा केलेला काय. ? नव्हे. तर चुकून झालेला. आणि जो आपला खरा मित्र आहे, तो आपणास बुद्धि- पुरस्सर दु:ख देईल काय ? नाहीं. तेव्हां त्याला क्षमा करण्याचे प्रयोजनच नाहीं. ह्मणूनच नीतिशास्त्रानें त्याविषयीं मौन धरिलें असावें.
 सूड उगविण्याचा स्वभाव फार वाईट आहे. तो ज्याचेठायीं असतो, त्याचें मन हितकारक गोष्टींकडे न लागतां, त्यास ज्याने छळिलें असेल, त्याचा सूड घेण्यास कोणत्या रीतीनें कशी संधि साधावी, ह्यावि- चारांत भ्रमत असतें. अशापासून कांहीं फायदा नाहीं.