पान:मधुमक्षिका.pdf/२०४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १९४ )

याविषयी मात्र जपावें. ह्यापलीकडे त्यांच्या विचारांत . फायदा नाहीं, असें विद्वज्जनांचें मत आहे. कारण, विद्यमानी चाललेल्या व पुढें प्राप्त होणाऱ्या गोष्टींचा विचार, जो अगदीं आवश्यक आहे, तो करण्यास दे- खील आपलें आयुष्य पुरत नाहीं; तेव्हां, चर्वितचर्व- णांत काय लाभ आहे. ? लोकांस दुःख देणें हें आपलें कर्तव्यकर्म आहे, असें कोणीही समजत नाहीं. परंतु, कांहीँ नफा, संतोष, समाधान,इत्यादिकांच्या लोभाने मनुष्य परपीडेस प्रवृत्त होतो.ह्यांत कांहीं विशेष नाहीं. कां कीं, स्वसमाधानाचा उपाय करण्याची इच्छा यावत् प्राण्यांमध्ये जन्मत:च असते. तर तिला वश होऊन जो पुरुष सारासार विचार न पाहतां वागतो, त्याचा राग करून किंवा सूड उगवून उपयोग काय. ? त्यापासून ती दुष्ट वासना मात्र जास्त होणार.
 स्वहित नसत केवळ दुष्टबुद्धीनें जो पुरुष दुस- यस दु:ख देण्यास प्रवृत्त होतो, तो एक कंटकच समजावा. पाहा. कांट्याचा उपयोग दुसऱ्यास भोंसकण्यावांचून दुसरा कांहीं आहे काय. ? नाहीं. तद्वत्, अशा दुष्टांचे हावून दुसरें कांहीं एक न घडतां परपीडा मात्र व्हावयाची.' ज्या अपराधाचा बंदोबस्त सरकारच्या कायद्यानें होत नाहीं, त्याबद्दल सूड घेत- ला, तर एकवेळ शोभेल. परंतु, ज्यांचा बंदोबस्त काय- द्याने होतो, त्यांचा सूड उगविल्यास तक्षकपणाचा एक, व राजाज्ञाभंगाचा एक, असे दोन दोष माथां श्रेताय. आणखी शिवाय शत्रूस जास्त देव येतो.