पान:मधुमक्षिका.pdf/२०३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १९३ )

क्या मनुष्याने येऊन एकाएकीं त्याचे तोंडांत मारिली तर तो उलट त्याला मारील काय. ? अथवा सरकारांत फिर्याद जाईल काय ? नाहीं. तर, त्याचप्रमाणें आपण दुष्टाचे अपराधांची क्षमा करून त्याचा सूड उगवूं नये, हें आपणांस उचित आहे.
 मनुष्य एकांती विचार करीत असतां देखील,स्वपक्ष कसाही असला तरी तो खरासा वाटतो. वा त्याला मग उघडपणें दुसऱ्याशीं वाद लागल्यावर तो आपला पक्ष खरा करून दाखविण्याविषयीं भगीरथ प्रयत्न करील, ह्यांत कांहीं नवल नाहीं. शाहणा आणि मोठा कायतो मी, असें प्रत्येकाला वाटत असतें. आणि तसें जो कोणी आपणास मानीत नाहीं, तो आपला वैरी, असें तो समजतो, व त्याचा सूड उगविण्याची संधि पाहात असतो.
 - कधीं असें घडतें कीं, एकाद्याने दुसऱ्याचा कांहीं थोडासा अपराध केला, ह्मणजे दुसरा त्याला लागलेंच शासन करितो. तेव्हां त्याला असे वाटतें कीं, माझा अपराध एवढा नसतां, ह्यानें बुद्धिपूरः सर मला दुखवि- ण्यासाठी इतकी इजा केली. असें मनांत आल्यावर जास्त वाटलेल्या शिक्षेचा सूड तो पुनः दुसऱ्यावर काढितो. तेव्हां दुसऱ्याला असें वाटतें कीं, मी जशा- सतसें केलें, आतां हा उगीच मागे लागला आहे. ह्यामुळे तो पहिल्याला फार रागाने आणखी दुखवितो. वैमनस्यें ह्याप्रमाणें वाढतात. शेवटी त्यांचा परिणाम अतिभयंकर होतो.
 ज्या गोष्टी घडून गेल्या, त्यांवरून पुढे सावध राह-

१७