पान:मधुमक्षिका.pdf/२०२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १९२ )

जागा त्याच्या स्मरणांत राहातात असें नाहीं. पुष्कळ चुकतात. भाणि जीं फळें अशा विस्मरणानें जमि- नींत राहातात, त्यांचे कदाचित् मोठमोठे वृक्षही होतात. केवढा ह्या प्राण्याचा उद्योग, आणि काय ईश्वरी कौतुक पाहा. ! ज्या ओक वृक्षाविषयीं इंग्लंद इतका गर्व वाहतें, तें झाड एवढ्याशा प्राण्याच्या श्रमांचें व विस्मरणाचें फळ आहे.!


सूड उगविणें.

 सूड उगविण्याची खोड फार वाईट आहे. तिज- पासून जनांमध्यें चांगलें कांहीं होत नाहीं; वाइटाचे मात्र पर्वत पडतात. दुष्टबुद्धीनें आपणांस कोणीं दुखविलें, ह्मणजे तात्काल त्याला दुप्पट दुखवावें, असें आपल्या मनांत येतें. पण तें करणें चांगलें काय. ? त्यापासून कोणाचें तरी हित होईल काय ? एकाद्यानें आपलें घर जाळिलें; तर त्याबद्दल आपण त्याचें जाळं नये. कां तर त्यापासून फायदा कोणाचाच नाहीं, आणि जगांत नाशाची मात्र वृद्धि होते. आणखी असें आहे कीं, सामान्यतः कोणत्याही प्रकारें मनुष्यास दुःख देणें, हें अत्यंत नीच होय. तें एकाद्यानें आपणा- स दिलें, तर तो दुष्ट खराच. आपण उलट जर त्याला दिलें, तर तो आणि आपण एक सारखेच पापकर्मे झालों; आपणांकडे श्रेस्त्तव आले नाही.मांजर वाडपणाने एकाद्या सुज्ञ तर, सूड डसावें. 'उगविण्याकरितां त्यानें त्याला उलट दासले ? कोणी मोठा पुरुष रस्त्यांतून चालला असतां,एकाद्या हल