पान:मधुमक्षिका.pdf/२०१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १९१ )

आहे की, ३२१० मनुष्यांत एक मनुष्य १०० वर्षे वाचते. दाईकडून पाजिलेल्या १००० मुलां पैकीं ५०० मरतात; तितकींच जर आईनें पाजिलीं तर ३०० मरतात. दरिद्री लोकांपेक्षां सुखी लोक जास्त दिवस जगतात. जीवंत जन्मलेल्या मुलां पैकीं अकरामहिन्यांचीं होण्या पूर्वी मरतात; तेवीस महि- न्यांची होण्यापूर्वी मरतात; आठवे वर्षापूर्वी मरतात. सर्व जनाचे एकुण चाळिसावे वर्षापूर्वी, व एकाव- नावे वर्षापूर्वी मरतात. फार झाले तर १२००० मनुष्यां पैकीं १ मनुष्य १०० वर्षांहून जास्त दिवस वांचतो.

बफन.

 मार्चात माणसे फार मरतात; त्याच्या खालोखाल आगष्टांत व सप्तंबरांत; आणि नोवेंबर, दिसेंबर, व फे- ब्रुवारी, ह्यांत फार थोडीं मरतात. विवाहित स्त्रिया अविवाहित स्त्रियांपेक्षां फार दिवस जगतात.
 ५.इंग्लदांत मानमथ प्रांतामध्ये एका मोठ्या मैदा- नांत कोलोना ह्या नांवाचा पुरुष हवा खात फिरत होता. त्याने एक खार जमीनीवर बसलेली पाहिली. ती तात्काळ विजेसारखी जवळच्या ओक वृक्षावर चढली, त्याच्या शेंड्यास गेली, आणि तेथून एक फळ घेऊन खाली आली. तें तिनें तेथें थोडीशी माती उक रून पुरून ठेविलें. ह्या प्रमाणें, कोलोना जो पावेतों तेथें पाहात होता, तो पावेतों, ती एक सारखें करीत होती. अशी तिनें पुष्कळ फळें पुरून टोवेलीं. ही तिची हिंवाळ्याची खाण्याची तजवीज असावी, असें • वाटतें. जितकीं फळें हा प्राणी पुरून ठेवितो, तितक्यांच्या