पान:मधुमक्षिका.pdf/२००

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १९० )

शाचा वांटेकरी आहेस, नव्हे; ? घे तर ह्यांतले ९ घोडे. ( मधल्यास ) तुझी तिजाई आहे; घे हे आपले ६ घोडे.. ' (धाकट्यास) नववा हिस्सा तुझा ना.? घे तर आपले २. घोडे. आतां बाकी राहिला एक; हा तर बाबा माझा आहे. मी काय ह्मणून आपला घोडा तुह्मांला देईन. ? हा मी आपला घेऊन जातो.
 ह्या प्रमाणें त्या पुरुषानें घोडयांच्या जीवांस धक्का न लावतां प्रत्येकास वाजवीपेक्षां जास्त हिस्सा देऊन त्या मूर्खाची समजूत केली. आणि त्यांस त्यांच्या घरीं जाऊं दिलें. हें चातुर्थ व ही समयसूचकता पाहून राजा फार खुष झाला.आणि न्यायाधीशास त्याने मोठे इनाम दिलें.
 सारांश ' क्रियेवांचून ज्ञान पंगू,' अशी जी लोकांत ह्मण आहे, ती अक्षरशः खरी आहे. आपणांस पुष्कळ गोष्टी माहित आहेत, व आपण मोठे विद्वान आहों. पण त्या ज्ञानाचा उपयोग जर प्रसंगों न करतां येईल, तर ते असून आणि नसून सारखेच आहे.

मराठी ज्ञानप्रसारक.

 ३. आफ्रिकेतील मुंग्यांचे असे थव्यांचेथवे बाहेर. पडतात कीं, जशी काय जमीनच चालत आहे, अशी भासते. ह्यांपैकी एका थव्याने एका हत्तीवर चाल केली. आणि आठ तासांनीं आलीं पाहूं लागलों तो तेथें अस्थिपंजर मात्र दृष्टीस पडला.. पहा. हे प्राणी लहान खरे.तरी ‘दसका लकडी एक्का बोजा ' ह्या न्यायानें हैं एवढे कृत्य झालें.
 ४. आयुष्याची परिमिति. - अनुभवावरून समजलें