पान:मधुमक्षिका.pdf/१९९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १८९ )

विचार करून त्याने तिघांजणांसही आपले समोर उभे केलें. आणि खालीं लिहिल्याप्रमाणें सवाल केले.
 न्यायाधीश. - काय हो, तुमचा काप तंटा आहे. ?
 तिघे पुत्र. - महाराज, तंटा ह्मणून इतकाच कीं, आमच्या बापानें लिहून ठेविल्या प्रमाणें यथाविभाग ह्या घोड्यांची वांटणी आह्मांस मिळाली पाहिजे. ठरल्या हिशांत "कमी होतां कामास नये, आणि घोडे सबंद मिळाले पाहिजेत.
 न्याया.–एवढेंचना ? ह्यांत काय आहे. ? बरें अगो- दर हें सांगा कीं, तुमच्यांतून प्रत्येकास तुमच्या वाजवी हिशापेक्षां जास्ती भाग जर मिळाला, तर त्याला तुझी कबूल आहां कीं नाहीं. ?
  ति. - होय महाराज, आमचें बरेंच झाले.
 न्या. - आणा तर मग तुमचे कोठें आहेत ते १७ घोडे, आणि करा माझ्या समोर उभे.
हे शब्द ऐकतांच तिघांसही मोठा आनंद झाला. आणि आज्ञेप्रमाणे सर्व घोडे आणून त्यांनी न्यायाधी- शापुढे उभे केले. ते पाहून न्यायाधीशानें मोतद्दारा - स हाक मारिली, आणि त्याकडून आपला खासगी घो- डा आणून त्या घोड्यांच्या रांगेत उभा केला. नंतर त्यानें त्या तिघांजणांतून वडील मुलास एकंदर घोडे किती झाले ह्मणून विचारिलें.
 वडील पु. - महाराज १८ झाले.
 न्यायाधी.- (तिघांजणांस पुढे उभे करून) पाहिलेंरे बाबा ! हे १८ घोडे आहेत. हे सर्व तुमचेच आहेत, असें क्षणभर समजा. (नंतर वडील मुलास ह्मणतो), तूं निम्मे हि-