पान:मधुमक्षिका.pdf/१९८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १८८ )

हे शब्द ऐकतांच त्याचें तोंड उतरलें, हें त्या लोकांनीं भयाचें चिन्ह जाणून त्यास धरून नेलें. आणि दोस्तमहंमद खुशाल खुलुमाकडे गेला.
(इ. स. १८४० ).
 हिंदुस्थानांतील इंग्लिशराज्याचा इतिहास. २. एका शहरांत एक श्रीमान् सावकार राहात, होता. त्याला तीन पुत्र होते. सृष्टिक्रमानुसार सावकार, मरण पावला. त्यानें मरावयाच्या पूर्वी आपल्या मृत्युपत्रांत आपल्या जिनगीची अशी व्यवस्था करून ठेविली होती की, वडील पुत्राने सर्व जिनगीचा निमे हिस्सा घ्यावा, मधल्याने सर्व जिनगीचा तिसरा हिस्सा घ्यावा, 'आणि कनिष्ठाने नववा हिस्सा घ्यावा. ह्याप्रमाणे बापाचा स्वदस्तूरचा लेख पाहून स्थावर जंगम सर्व जिनगी हिस्सेरशीनें तिघांनीं वांटून घेतली. शेवटीं घोडे १७ उरले.. त्यांची यथाभाग वांटणी करावयास ते लागले. परंतु एक दोन घोडे कापल्या खेरीज हि- से बरोबर पडतना. शेवटीं भांडत भांडत ते शह- रच्या राजाकडे गेले. परंतु, राजाचीही अक्कल त्या कामांत अगदीं चालेनाशी झाली. तेव्हां त्यानें न्या- याधीशास बोलावून आणून त्या खटल्याचा निवाडा करावयास सांगितले.
 न्यायाधीशानें मृत्युपत्र चांगलें लक्ष लावून वाचिलें. परंतु तंटा मिटण्यासारखा त्यांत त्याला आधार कांहीं दिसेना. हा गृहस्थ मोठा चतुर व न्यायाच्या कामांत फार निष्णात होता. कांहीं तरी युक्ति काढिल्या वां- चून त्या मूर्खाची समजूत व्हावयाची नाहीं; असा