पान:मधुमक्षिका.pdf/१९७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १८७ )
चमत्कारिक गोष्टी.

दोस्तमहंमद हा बुखाराप्रांतांत गेल्यावर, ते- थील खानानें त्यास आपल्या दरबारांत बोलावून नेलें; मग तो आपल्या. हातीं सांपडला, असें खचीत झाल्यावर, त्यास कैदेदाखल प्रतिबंधांत ठेविलें; तेथून त्यानें रखवा - लदारांस लांच देऊन आपली सुटका करून घेतली; आणि एक उझबेक वाटाड्या आणि एक आपण असे दोघे खुलमाकडे येऊं लागले. वाटेनें एक लि- हिण्याजोगी नक्कल घडली, ती अशी.दोस्तमहंमदा-चा घोडा किंचित् लंगडूं लागला, ह्मणून तो आपल्या- सोबत्यास देऊन आपण त्याचें मजबूत लहानसर तट्टू होतें, त्याजवर बसून चालला. तो त्याचा सोबती, आपण महंमदास पळविलें हैं प्रसिद्ध झालें असतां आ- पणावर खानाचा राग होईल, ह्मणून मनांत भय मा- नीत होता, आणि कोणी खानाकडील लोक भेटल्यास, दोस्तमहंमद ह्यास त्यांच्या स्वाधीन करून आपले कार्य साधण्याविषयीं त्याच्या मनांत लोभ उत्पन्न झाला होता. इतक्यांत त्यास कोणी दोस्तमहंमदाच्या विरुद्धपक्षाचे स्वार भेटले. त्यांशीं त्याविषयीं व फिरंग्यांविषयीं गो- ष्टी बोलत असतां तो त्यांस ह्मणाला, “तुह्मांस बक्षीस पाहिजे असल्यास तो सरदार जातो आहे तो पहा; तो दोस्तमहंमद आहे. तो आतांच बुखाऱ्याच्या राजाच्या कै- देपासून सुटून चालला आहे." हे ऐकून ते ह्मणाले, “तूं लबाड आहेस; दोस्तमहंमद दरिद्री तट्टावर, आणि तूं त्याचा सोबती मातबर पाठाळावर, असें कसें घडेल ? तूंच दोस्तमहंमद. चल आमच्याबरोबर बुखायास."