पान:मधुमक्षिका.pdf/१९६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १८६ )

तेथेच ठार मारिलें हैं कृत्य राघोबादादाने करविलें असा पुष्कळांस संशय आला.रामशास्त्री ह्यांनी तर ह्या गोष्टीचा फार बारीक रीतीनें शोध केला; आणि त्याविषयींचें खुद्द त्याचे हातचें पत्र मिळविलें. तें पत्र घेऊन ते एके दिवशीं राघोबादादाकडे गेले; आणि "बोलिले कीं, तुला कांहीं झणा, हें कृत्य तुमचेखेरीज दुसरे कोणी केलें नाहीं, हें मला पक्के समजलें. तेव्हां आतां चोरून कांहीं उपयोग नाहीं, असें पाहून त्यानें शास्त्रीबावांस असें सांगितलें कीं, मी पत्रामध्यें धरावा असें लिहिलें होतें, मारावा, असें लिहिलें नव्हतें, तो धच्चा मा कोणी केला हे मला ठाऊक नाहीं. तेव्हां, हें कर्म आनंदीबाईचें, ह्मणजे राघोबाच्या बायकोचें असेल, असा सर्वांनी अजमास केला.नंतर राघोबानें शास्त्री- बाबांस असे पुसलें कीं, कोणत्याही पर्यायानें असो, परंतु हे पातक माझ्या माथी आले.ह्यास प्रायश्चित्त काय करावें.? त्यावर त्या निस्पृह पुरुषानें उत्तर दिलें कीं, ह्यास देहांत प्रायश्चित्त पाहिजे. कारण, ह्यापुढे तुमचे हातून सद्वर्तन होण्याचें लक्षण दिसत नाहीं; आतां तुमच्या राज्याची व तुमची धडगत नाहीं; तुह्मी राज्य करीत असाल तोंपर्यंत मी ह्या शहरांत पुनः येणार नाहीं; आजपावेतों मी सरकारचा आश्रित होतों, तो आतां नव्हे; असें भाषण करून तो ब्राह्मण सटकर उटून गेला.

 हा पेशवा आपले वयाचे १८ वेवर्षी मारला गेला. तेणेंकरून त्याचे गुणावगुण पुरतेपणे बाहेर पडले नव्हते; व जे पडले होते ते प्रसिद्धीस आले नव्हते.