पान:मधुमक्षिका.pdf/१९५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१८५)

रंगमहालामध्यें सुखशय्येवर स्वस्थ निजला होता. इतक्यांत वाड्यामध्ये एकाएकी मोठी गडबड झाली. तिच्या योगानें तो जागृत झाला. दंगा कशाचा ह्मणू- न तो बाहेर पाहतो तों, गारदी लोक त्याच्या दृष्टीस पडले. तेव्हांच त्याच्या मनाला धक्का बसला; आणि इकडे तिकडे पाहातो इतक्यांत, ते सर्व जमून आपले अंगावर चालून येत आहेत, असें त्यानें पाहिलें. मग तर त्याच्या काळजानें ठाव सोडला. मग काय पुसावयाचें आहे. ? तो घाबन्या घाबऱ्या पळत पळत, आपला चुलता राघोबा दादा ह्याजकडे गेला. आणि त्याचे कमरेस मिठी मारून बोलिला, "काका, काका, माझा जीव वांचवा " हें तो बोलतो आहे, तोंच सुमेरसिंग गारदी त्या खोलींत येऊन थडकला. त्यास नारायणरावाला न मारण्याविषयीं राघोबा दादाने पुष्कळ सांगितलें. परंतु, तो कांहीं ऐकेना. आणि तो शेवटीं बोलिला की, दादा साहेब, सरकाराला आपण सोडून देऊन दूर व्हावें, नाहीं तर हा सुमेरसिंग उभयतांचेही प्राण घेईल; विचार पाहा. हें भाषण ऐकतांच राघोबादादाने त्याला सो- डून आपण गच्चीची वाट धरली. नारायणरावही तिकडे पळत चालला. इतक्यांत रघुनाथरावाचा हत्यारबंद श्वाकर तुळाजी, ह्यानें नारायणरावास पाय ओढून जमि- नीवर पालथें पाडिलें. त्याचे आंगावर सुमेर। शिंग तरवार उपसून धांवला. तेव्हां नारायणरावाचा परम- विश्वासू नौकर चांफाजी टिळेकर हा, आपल्या धन्याच्या रक्षणार्थ त्याच्या आंगावर पडला. त्या उभयतां स्वामि- सेवकांस तुळाजीनें व सुमेराशिंगानें, तरवारीच्या वारांनी