पान:मधुमक्षिका.pdf/१९४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १८४ )

तेणें करून त्यांस थंडीची बाधा होत नाहीं. रेनदीर ह्मणून एक प्रकारची हरणें तेथें पुष्कळ असतात. तीं तेथील लोकांस घोडा, बैल, मेंढी, गाय, ह्यांचे जागीं उपयोगी पडतात. तेथल्या लोकांची संपत्ति कायती त्यांतच असते. कुत्राही त्यांस पुष्कळ कामास लागतो. तेथले कुत्रे लहानशी गाडी एका दिवसांत सुमारे ५० कोस ओहून नेतात. गाडीवर बसणाऱ्याने बर्फ पडूं लागल्यामुळे जरी आपले डोळे मिटले, तरी ते वाट सोडीत नाहींत. त्यांचें मांस हें तेथले लोक मिष्टान मानितात तथापि त्या प्राण्यांची ते इतकी किंमत समजतात कीं, यजमानावर तसाच बिकट प्रसंग गुद- रल्यावांचून तो आपल्या कुत्र्यांस हात लावीत नाहीं. सीत देशामध्यें व्हेल व सील हे प्रचंड मत्स्य सांपडतात. त्यांवरही कितीएक लोकांची उपजीविका चालते. येथील लोक खुजे परंतु बळकट व उद्योगी असतात, ते आपलीं शरीरें सकेश चर्मानें आच्छादितात.
 येणें प्रमाणें तीन प्रकारच्या देशांचें सामान्य व संक्षिप्त वर्णन आहे.


नारायणराव पेशवा ह्याचा शेवट.

 बाळाजी बाजीराव ऊर्फ नाना साहेब ह्याचा मुलगा नारायणराव, हा इ० स० १७७२ त पेशवाईचे गादी वर बसला. १७७३ त मारला गेला. तो इ० स० त्याची हकीकत चमत्कारिक आहे. ती येणें प्रमाणे:-
 इ० स० १७७३ च्या आगस्त महिन्याच्या २० व्या तारखेस नारायणराव पेशवा भोजन करून आपल्या