पान:मधुमक्षिका.pdf/१९३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १८३ )

निर्माण होण्याची तजवीज ठेविली आहे. तेणेंकरून “लोक बारीक रेशमी कपडे पांघरून सुखाने राहतात.
 समसीतोष्ण देश. - ह्यांत मनुष्यांस उपयोगी पडणा- रे प्राणी पुष्कळ होतात. घोड़ा, बैल, आणि मेंढा, हीं जनावरें येथें चांगलीं निपजतात. मनुष्यांला खावया - ला मांस व पांघरायला उबदार वस्त्रे मिळून, तीं त्यांचीं ओझी वाहातात. ह्यांत गुरांकरितां गवत व मनु- ष्यांकरितां धान्य हीं येथें यथेच्छ पिकतात. वर सांगि- तलेले प्राणी शीतप्रदेशांत जगत नाहींत. आणि कोणी घोडा तिकडे नेलाच तर त्याची अवलाद अगदी बेढब व खुरटी होऊन जाते. गाय ही उष्णदेशांत समसीतोष्ण देशाप्रमाणे उपयोगी पडत नाहीं; आणि तेथें मेंढी नेली तर तिच्या अंगावर उपयुक्त मऊ लोकर येईनाशी होऊन, निरुपयोगी रांठ केस उगवू लागतात. इतर प्रदेशांपेक्षां ह्यांत नानाप्रकारच्या अनेक उपयोगी वनस्पति उत्पन्न होतात. कोळसा, लोखंड, शिसें, तांबें, इत्यादि धातु, ह्यांत पुष्कळ सांपडतात. हे मनु- - ब्यांच्या सुखास फार अवश्य असल्यामुळे त्यांचा व्यापार येथे फार चालतो. येथील लोकांचा बांधा मध्यमप्रती- चा असतो. ते फळें, धान्यें, व मांस खाऊन राहतात. येथे वनस्पतींच्या उत्पन्नावर लोक फारसे राहात नाहींत. . सीतदेश. - यांतील जमीन पिकाऊ नसते. उन्हा- "ळा फार थोडा असल्यामुळें फळें व धान्यें पुरतीं पिकत देखील नाहींत. झाडें व वनस्पति कमी. लोक बहु- धा मांसावर उपजीविका करितात. तें त्यांस तेथे यथे.. च्छ सांपडते. पशूंच्या सकेश चर्मांचीं ते वस्त्रे करितात.