पान:मधुमक्षिका.pdf/१९२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १८२ )


तेनें तप्त झालेल्या मनुष्यास थंडगार वाटावें, आणि समा- धान व्हावे, असे उत्पन्न होतात.जमिनीवर असणारा अति मोठा प्राणी हत्ती, हा उष्णदेशांत सांपडतो. हत्ती १० . फुटांपासून १२ फूट पावेतों उंच, व १३ किंवा १४ फूट लांब असून, ६ किंवा ७ हजार पौंड भरतों. तो शरीरानें इतका अवजड आहे तरी, एका दिवसांत ६०।७० मैलांची मजल सहज करितो. तो ६०० पौंडांचे ओझें घेऊन १० तासांत ६० मैल जातो. उष्ण प्रदेशांत उठें नसती, तर कितीएक प्रांत मनुष्यांस दुर्गम झाले असते. शहामृग हा एक मोठा पक्षी उष्ण प्रदेशांत आढळतो. त्याची उंची जमिनीपासून तों त्याच्या पाठीपर्यंत ७/८ फूट भरते.त्याचे पंख अगदीं - व आंखड परंतु फार सुंदर असतात.कसाही जलद घोडा असला, तरी त्यास चालण्यामध्ये हा पक्षी मागें ट।कितो. बोआकान्स्त्रक्तर ह्मणून जी अजगर सर्प- जाति ३०।४० फूट लांब असते, ती मूळची उष्ण देशांतील होय. ह्या सर्पानें मनुष्यासच काय, परंतु एकाद्या ताठर बैलासही जर मिठी घातली, तर त्याच्या हाडांचे तुकडे तुकडे होऊन जातात. आणि तो ते तसे च गिळितो. - उष्णदेशांतले लोक समशीतोउष्ण देशां- तल्या लोकांइतके बळकट व चपळ नसतात. तथापि, तेथील जमीन चांगली पिकाऊ असल्यामुळे अल्प श्रमानें उत्तम धान्यें व फळें उत्पन्न होतात. झाडे व शेतें चोहीं- कडे नेहमी हिरवीं चार दिसतात. हवा अत्युष्ण असल्या- मुळे तेथील लोकांस जाड व जड कपडे आंगावर घेववणार नाहीं, हें जाणून विश्वपालकाने तेथे रेशमाचे किडे पुष्कळ