पान:मधुमक्षिका.pdf/१९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १८१ )

मी दुःखी आहें, असें मला वाटणार नाहीं. - हैं सगळें खरें, पण आपल्या तुलाओलेची वाट काय करावी. ?ह्यविषयीं मला आतां कांहीं कळत नाहीं. तुला बरें वाटेल, तसें तूं कर. आपलें कांहींही होवो. त्या लहान मुलीची सर्व तजवीज बरोबर लावणें आपणांस भाग आहे. धाकटा सिसरो, त्याला मी संभाळीनच. आतां, ह्या हुंडक्यापुढे माझ्याने जास्त लिहवत नाहीं. तूंच आतां स्वतःला सांभाळून मला टेंका देशील तो खरा. आपण पुष्कळ सुखें पाहिली आहेत. आतां आपणांवर जो हा प्रसंग गुदरला आहे, तो आपल्या अंगच्या दुर्गुणामुळे गुदरला आहे असें नाहीं; तर केवळ प्रारब्धाने प्राप्त झाला आहे. असो. शरीर प्रकृतीस फार जपत जा. माझ्या स्वतःच्या विपत्तीपेक्षां तुझ्या विपत्तीचें मला फार दु:ख होते. ईश्वर तुला निश्चित करो. लोभ असावा हे आशीर्वाद.


उष्णतेच्या मानावरून देशांचे वर्णन.

 उष्ण देश. - भिन्न भिन्न देशांमध्यें प्राणी, वनस्पति आणि खनिज पदार्थ, हे वेगवेगळे प्रकारचे असतात. त्यांत सृष्टिकर्त्या कारागिराचें असें अतर्क्य चातुर्य दिसून येतें कीं, ज्या देशांतील प्राण्यांस ' जे पदार्थ अगदीं आवश्यक असतील, ते तेथल्या हवेंत उत्पन्न व्हावे, अशी योजना त्याने करून ठेविली आहे. पाहा. उष्णदेशांमध्यें साखर, खारीख, नारळ, खजूर, लिंबू, नारिंग, अननस, इत्यादि पदार्थ, की जे खाल्याने, उष्ण

१६