पान:मधुमक्षिका.pdf/१९०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १८० )

झालें नाहीं, व सांप्रत होत नाहीं, हें तूं पक्के समज. तूं आतां माझ्या डोळ्यांपुढे मला दिसतीस तेणेंकरून हा हुंड- का माझ्याने गट्ट करवला नाहीं. लोभ असूंदे हे आशीर्वाद.

( पत्र चवथें. )

 हे प्रिये,  मजकडून जितकीं पत्रे तुला जावीं तितकीं जात नाहीत ह्याचें कारण असें कीं, तुजकडील आलेली पत्रे वाचणें अथवा तुला लिहिणें लटलें ह्मणजे मला परमदुःख होतें. हे जिवलगे, ज्यांची तूं एकनिष्ठपणे सेवा करितेस, ते देव, व ज्यांच्या बऱ्याकरितां मी अहोरात्र झटलों, ते लोक जर आपल्या ह्या संकटाचें निवारण करण्यास समर्थ नाहींत, तर आतां वाट पाहून तरी काय फळ ? होऊं दे एकदां तुझी माझी भेट आणि मरूं दे मला तुझ्या गळपास शेवटची मिठी मारून. ! कि- ती. मी हतभाग्य ! किती मी दुष्ट. !दुःखानें गांजिले- ल्या अबलेस, तूं मजपाशीं येऊन राहा, असें मी 'ह्मणों काय ? न ह्मणून तरी काय करूं ? हे प्राण- सखे, हा जीवमीन त्वत्सहवासोदकासाठी तडफडत आहे. मला तुजवांचून पलभर देखील राहवत नाहीं.पण काय करूं ? पल कोणीकडेसच राहिलें; महिन्यांचे .महिने घालविणें. कपाळीं आलें आहे. माझ्या पुन- रागमनाची कांहीं आशा असली, तर तूं होती . तितके उपाय करून पाहा. आणि आशा नसलीच, तर मजकडे येण्याचे तरी कांहीं संधान कर. मी स्वदेश पुनः ह्या डोळ्यांनी पाहीन, असें मला तर आतां वाटत नाहीं. हैं खचीत समज कीं, तूं माझ्या जवळ असलीस ह्मणजे