पान:मधुमक्षिका.pdf/१८९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १७९ )

आहे; तरी तुझ्यापेक्षां मी अधिक दु:खी आहें. ह्याचें कारण हेंच कीं, जरी उभयतां आपण समदुःखी आहों; तरी ह्या सर्व दुःखांस मूळकारण मी, माझ्या अज्ञानानें हा संकटप्रसंग ओढवला, असे वारंवार माझे मनांत येतें. मला देशांतून घालवून दिलें, त्यापेक्षां माझा जीव घेत- ला असता तर बरें होतें. मी केवळ दुःखसमुद्रांतच बुडालों आहें, असें नाहीं; तर लज्जाही इतकी प्राप्त झाली आहे की, मला आतां जगांत तोंड दाखविण्यास जागा नाहीं, असें मला वाटतें. मी आपल्या बायकामु- लांच्या कल्याणास्तव झटलों नाहीं, ह्याची मला लाज वाटते. तूं नेहमीं रडत, कण्हत, किंवा आजारी, अशी माझे नजरेपुढे दिसतेस. ह्यावरून तुझी माझी गांठ पडण्याची मला कांहीं आशा नाहीं. तथापि तुला आशा आहे तोपावेतों, तूं सांगशील तसा वाग- vara मी सिद्ध आहें. तू ज्यांविषयीं लिहिलें, त्या मित्रांचे मी आभार मानिले व त्यांच्या खटपटी तूं मला कळविल्या हेंही त्यांस मीं कळविलें आहे. पिसो हा माझ्या वयासाठीं आपली पराकाष्ठा करून राहिला आहे, हें मी जाणतों. असा जांवाई आणि आपण सर्व मुलेबाळें एकत्र होऊं, असा दिवस परमेश्वर कधीं दाख- बोल ! तूं मजकडे येण्याविषयीं विचारतेस; त्यास तूं इकडे येऊं नको; आहेस तेथेंच ऐस. रोमामध्यें तुजवांचून माझा खरा जिवाचा हितकर्ता दुसरा कोणी नाहीं. तुझे यत्न सफल झाले, तर तुझी माझी भेट नाहीं तर आतां माझ्यानें आणखी लिहिवत नाहीं. शरीर प्रकृ तीस जपत जा. तुझे इतकें प्रिय ह्यापूर्वी मला कांहीं