पान:मधुमक्षिका.pdf/१८८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १७८ )

देखील आणवत नाहीं. बरें; इतकेंही करून माझी सुटका झाली तर बरी; घरदार पुनः जमवूं. पण दुर्दै- वानें पाऊल पुढे नच पडूं दिलें, तर हाती आहे तें जाऊन जास्त विपत्ति मात्र होणार आहे, नव्हे काय ? नको तर, माझे प्रिये, हातचें गमावू नको. जे माझे श्रीमान् मित्र मजसाठी पैसा खर्चण्यास समर्थ व सिद्ध आहेत, त्यांसच तें काम करूं दे. तू ह्या भरीस पंडूं नको. मी जवळ नाहीं ह्मणून तूं चिंता- क्रांत होऊं नको, तुझी प्रकृति अधिक बिघडेल; कारण तूं आधींच अशक्त झाली आहेस. तूं मला अहोरात्र डोळ्यांपुढे दिसतेस. परमचिंताग्रस्त तूं आहेस, असें मला वाटतें. तू नेहमीं अशी काळजी वाहाशील, तर तिच्या भाराने एकादे दिवशी भलतेच करून बसशील. परंतु, तूं धैर्यशाली आहेस, कांहीं झालें तरी डगमग- णारी नाहींस, हें मी जाणतों. तर शरीरप्रकृतीस जपत जा, आणखी आपले उद्योग सतत चालीव. जगदीशकृपेंकरून यश येईल. - लोभ असूंदे हे आशीर्वाद.

( पत्र तिसरें. )

 हे प्रिये,
 आरिस्ता कितस ह्यानें तुझीं तीन पत्रे मला दिलीं; तीं वाचतांवाचतां माझ्या अश्रुपातांनी अगदीं भिजून चिब्न झाली. हाय हाय ! माझे प्राणसखे तेरेशिये, मला आतां बिलकूल शक्ति राहिली नाहीं.मला आपल्या स्वतःच्या दुःखांपेक्षा तुझीं दुःखे अगदी दुर्वह झाली आहेत. तुजवर तर दुःखाचा डोंगर कोसळला