पान:मधुमक्षिका.pdf/१८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १७७ )

तुह्मां उभयतांस म्यां सुखांत पाहावें, असें मी इच्छीत होतों, व त्यासाठी महत्प्रयत्नही करीत होतों, परंतु काय प्रारब्ध पाहा ! तुझी परमसंकटांत आहां, असें ऐक- ण्याचा प्रसंग दुर्दैवाने मला आणिला आहे. ! असो ! मर्जी परमेश्वराची. ! माझ्या मुक्ततेकरितां तू धैर्य धरून प्रीति- पूर्वक अतिशक्ति प्रयत्न करितेस, हें मला समजलें. व तसें तू करशील ह्याविषयीं मला पूर्वीच खातरी होती. जीं दुःखें तूं मज करितां भोगीत आहेस, त्यांनी मात्र· माझ्या दुःखाचा भार कमी व्हावा, दुसरा उपाय राहू नये, असा वेळ परमात्म्याने आणिला, असें मनांत ' येऊन तर मला पराकाष्ठेच्या मनोवेदना होतात. पण हे जिवलगे, काय करूं ? इलाज चालत नाहीं. आप-ल्या व्हालिरियसाचें पत्र पोहोंचलें. त्यांत, तूं जें कांहीं मजकरितां रोम येथें केलें, त्याचें यथार्थ वर्णन आहे. तें वाचतांना तर मला असे रर्डे आलें कीं, तें मा- इयानें आंवरेना. हे प्रिये, ज्या तुझा लोभ संपादण्यास थोडेच दिवसांपूर्वी पुष्कळ मोठमोठे लोक लाळ घोटी- त होते, ती तूं केवळ मजसाठी दुःखार्णवांत पडून लो- कांमध्यें धायमाय मोकलून रडत फिरतीस. ! अहारे देवा! असें कांरे निष्ठर झालेंस ! तेरेनू शिये, हे सगळे दुःख माझ्यामुळे ना ? मी लोकांच्या नादी लागून फसलों. घर विकण्याविषयीं तूं विचारतेस, त्यास, आधींच माझ्या वियोगामुळे तुला दुःख झालें आहे; आणि त्यांत, घरा- सारखी आवश्यक वस्तु माझे सुटकेसाठी विकून माझे जिवापलीकडचे माणसांनी अधिक संकटांत पडावें, हा विचार मला इतकें दुःख देतो कीं, तो माझ्यानें मनांत