पान:मधुमक्षिका.pdf/१८६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १७६ )

णाला कांहींना कांहीं हणून वतनवाडी आहे, तरी दे खील आपली ही दशा. मग माझ्या बाळाला जर कांहींच न राहिले, तर त्याची काय अवस्था होईल बरें ? शिव शिव !! काय दुःख हें. ! आतां माझ्या नेत्रांतून अश्रुधा- फार बाहूं लागल्या, ह्मणून माझ्पानें पुढे लिहिवत नाहीं. व आणखी दुःख काढून तुला कष्टी करावें, हैं- ही नीट नव्हे. आपला बाळ आपण सध्यातर फार दुःखांत पाडिला आहे; तरी त्यास पुढे कांहीं सुख होईल अशी तजवीज करून ठेविली पाहिजे. वयांत आल्याव- र त्याचेठायीं एकादा गुण असला, तर त्यास तो दारि व्यापासून मात्र वांचवील. परंतु, त्याचे जोडीला जर थोडी बहुत मालमत्ता असेल, तर ती त्याला मोठ्या योग्य- तेस चढवील. - शरीर प्रकृतीस जपत जा. हमेषा पत्रे पाठवून वर्तमान कळवीत अस. मुलांस माझे आशीर्वाद सांग. लोभ असूंदे, हे आशीर्वाद.

( पत्र दुसरें. )

 हे प्रिये,
 एकाद्या मित्राकडून लांबच लांब पत्र आले, आणि त्याचें उत्तर तपशीलवार लिहावेच लागलें, तर मात्र मी तुझ्या पत्राइतकें लांब पत्र लिहितों. एरव्हीं कोणास लिहीत नाहीं, हें पक्के समज. ह्याचें कारण असें आहे कीं, पत्रे लिहिण्यास सध्या मला कांहीं सुचत नाहीं. आणि सांप्रतच्या अवस्थेंत लिहिणें झटलें ह्मणजे माझ्या 'अगदीं जीवावर येतें. त्यांत, तुजविषयीं, व प्रिय तुलि- भोलेविषयी लिहूं लागलों, ह्मणजे तर कंट दाटून येऊन नेत्रांतून घळघळां आश्रुधारा वाहूं लागतात. कारण,