पान:मधुमक्षिका.pdf/१८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १७५ )

किती मी दुष्ट ? किती मी हतभाग्य ? धिक् माझें जिणें . ! माझ्या करितां तुजसारख्या सुशील साध्वीला अत्यंत दुःसह दुःखें भोगावी लागतातना ! काय सांगावें. ? माझी लाडकी कन्या तुलिओला, हिचें माझे हावें लालनपालन व्हावें तें कोणीकडेसच राहून माझ्यामुळें तिला उलटे हाल सोसावे लागतात. ? काय माझें दुर्दैव हैं.! माझा लहान बाळ सिसरो, ह्यास पाळण्यांतच विपत्तीने गांठिलें, आणि त्याचें कारण काय तो मी, असें मनांत आलें ह्मणजे माझ्या अंतःकरणास जी व्यथा होते, मी काय सांगूं ? तूं ह्मणतेस त्याप्रमाणें हा विपत्काल आपणांस केवळळे दैवेंकरूनच जर प्राप्त होता, तर तो मला इतका दुःसह होता ना. परंतु, ही सगळीं माझ्या कर्माचीं फळें. ! मला तेव्हां अशी कशी तरी भूल पडली. ? जे लोक अंतर्यामी मजविषयीं दुष्ट वासना वागवून बाह्यात्कारें माझी मर्जी संपादीत होते, त्यांस मी मित्र मानिलें; आणि जे निर्मलांतःकरणानें माझा स्नेह इच्छीत होते, त्यांस जवळ येऊं दिलें नाहीं. - आ- तां, माझ्या पुनरागमनाची कांहीं आशा अद्याप आहे, असें कितीएक मित्र ह्मणतात; अझून मी आपले शरीरप्रक- तीस जपून आहें. पुनः आपण सगळीं एकत्र जमूं, असें ठानूसियसाचें अनुमान आहे. हे जिवलगे, असा दिवस येऊन, भगवत्कृपेनें, तुझी माझी गांठ पडेल, आणि तू मला आलिंगन देशील, त्या समयीं माझें सर्व पुण्य फळास आलें, असें मी समजेन. घरदार विकण्यावि षयीं तूं मला विचारितेस, व्यास, तरैनूशिये, पुरता विचार करून काय करणें तें कर. परिणाम पाहा. प्रिये, आप-