पान:मधुमक्षिका.pdf/१८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १७४ )

ल्यावांचून त्या घरा बाहेर पडत नाहींत; पण तेणेंकरून त्या कधीकधी प्राणांसही मुकतात."
 "पोर भांडयाबाहेर पडल्यावर लागलेच धागे काढू लागतें. तें एका दिवसाचें झालें, ह्मणजे माशा वगैरे आप- लें भक्ष्य मिळवूं लागतें. तें तीन चार दिवस अन्नापा- ण्यावांचून राहतें. तरी त्याच्या वाढीत कमतरता पडत नाहीं. त्याची वाढ फार जलद आहे. ती इतकी कीं, तें दोन दिवसांत दुप्पट होतें. हो त्याच्या पूर्ववयांत मात्र चालते; हातारपणीं चालत नाहीं. तरी त्याचे पाय लांब लांब होत जातात. वार्द्धक्यामुळें अन्न मिळविण्याचें सामर्थ्य नाहींसें झालें, ह्मणजे तो उपास काढत काढतां मरून जातो."


सिसरो.

 ह्या रोमन तयाचें नांव विद्वज्जनांत प्रसिद्ध आहे. त्याची वक्तृत्वाविषयीं व लिहिण्याच्या उत्तम शैलीविषयीं फार ख्याति होती. त्याने आपल्या महासाध्वी तरेशि. आ नामक प्रियकर पत्नीला जीं पत्रे परदेशांतून पाठवि- लीं, तों फारच प्रेमल, सुरस, व हृदयाला कळवळा आण- णारीं अशीं आहेत. त्यांपैकीं कांहीं कांहींची सरणी मी पुढें दर्शवितों.

( पत्र पहिलें. )

 हे परम प्रिये,  तुझ्या गुणांविषयीं, धैर्याविषयीं, व लोकहितार्थ अखंड श्रमांविषयीं माझ्या मित्रांच्या पत्रांवरून व लोकवार्तेवरून मला सर्व हकीकत समजते. हर हर ! हे जिवलगे,