पान:मधुमक्षिका.pdf/१८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १७३ )

पाहावें असें माझे मनांत आलें; ह्मणून मीं त्याचें तें घर मोडिलें. त्याने पुनः बांधिलें, तेंही मीं काटून टाकिलें.' तेव्हां त्याचा सगळा सांठा सरला. त्यानंतर त्याने ज्या संरक्षणाच्या युक्ति केल्या, त्या फारच चमत्कारिक होत्या. तो आपले पाय आगाशीं गुंडाळून घेऊन लहानशा गो- ळीसारखा कांहीं तास पावेतों निश्श्रेष्ट पडे; तरी फार सावध राहून, एकादी माशी टप्यांत आलीशी झाली, ह्मणजे तिला चटकन घरी आणि खात बसे."
 "पुढे ह्या स्थितीचा त्याला फार कंटाळा आला. तेव्हां त्यानें शेजारच्या कोळ्याच्या जाळ्पास तीन दिवस पर्यंत वेढा घालून, त्याच्या धन्यास ठार मारून तें घेतलें; आणि त्यांत ज्या माशा वगैरे अडकून सांपडत, त्यांजवर आपला निर्वाह चालविला. हा प्राणी तीन वर्षे वांचला. ह्याचे आंगाची कातडी आणि पाय, हीं दरवर्षास जुनीं जाऊन नवीं येतात. त्याचा एखादा पाय तोडला, तर तो पुनः तीन दिवसांनीं जशाचा तसा वाढतो. हा लव- कर माणसाळतो. माझ्या कोळ्यास प्रथम हात लाव- ण्यास मी गेलों, तेव्हां तो भिऊन जाऊन घरांत बसला परंतु, असें पांच चार वेळा झाल्यावर त्याची माझी इतकी. लगट जमली कीं, तो माझे हातावरून मारलेल्या माशा खुशाल उचलून नेत असे. "
 "ह्या प्राण्यांत नरांपेक्षां माद्या फार असतात. त्या आंडीं घालितात, त्यांत जीवंत पिल्लें असतात. तीं भांडीं घालतेवेळीं, त्यांचे खालीं त्या आपले जाळे पसरतात. आणि त्यांत त्यांस गुंडाळून ठेवितात, व उबवि- तात. संकटसमय प्राप्त झाला असतां, ही भांडी घेव-