पान:मधुमक्षिका.pdf/१८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १७२ )

जाळे तोडण्यास आरंभ केला. तेव्हां माझा कोळी जिवावर उदार होऊन त्यावर गेला; आणि त्याशीं लढून त्याचा ह्यानें प्राणच घेतला. "
 "पुढें तीन दिवसपर्यंत त्याला कांहीं एक शिकार सांपडली नाहीं. तरी तो खाण्यापिण्यावांचून स्वस्थपणे आपल्या जाळयाची डागडुजी करीत होता. तिसरे- दिवशी निळ्या रंगाची एक मोठी माशी येऊन त्याचे जाळ्यांत अडकली. ती इतकी बळकट होती कीं, तें ती तोडून सहज निघून गेली असती. पण ती सुटून जाण्यास फडफड करीत आहे, व बरीच गुरपटली आहे, भसें पाहून, तो कोळी आपल्या भोकांतून लवकर लवकर बाहेर पडून त्या माशीजवळ गेला; आणि तिज- सभोंवतीं त्यानें आपल्या धाग्याचे भराभर पन्नास वेढे दिले. त्यांच्या योगानें तिची धडपड वगैरे सर्व राहून ती बिचारी लवकरच प्राणास मुकली; आणि त्या राज• श्रींच्या भक्ष्यस्थानीं पडली. ती त्याला आठदिवस पुरली. "
 "एके दिवशीं मीं एक गांधीलमाशी धरून त्याच्या जाळ्यांत टाकिली. तिला धरण्यासाठीं तो नेहमी प्रमाणें मो. ठ्या त्वरेनें आला. परंतु, हा प्राणी आपणास भारी आहे, असें पाहून, त्याने आपल्या जाळ्याचे धागे तटातट तोडून त्या माशीला मोकळें केलें. ती निघून गेल्यावर, हा आतां आपलें जाळे नीट करण्याच्या कामास लागेल, असें मला वाटलें होतें; परंतु त्यानें तें सगळेच मोडून टाकून, तीन दिवसांत पुनः नवेंच तयार केले.”<br.  "एक कोळी भापलें जाळें कितीदा बांधू शकतो, हें