पान:मधुमक्षिका.pdf/१८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १७१ )

सर असल्यामुळे एकमेकांस चिकटण्यास कांहीं अडच ण पडत नाहीं. जाळे फाटण्याचें जेथें विशेष भय असतें, तेथें हा छोटा शिल्पकार, साहासाहापट धागे लावितो, असें पाहण्यांत आलें आहे. !
 कोणा एका ग्रंथकाराचा लेख ह्याविषयीं फार चम- त्कारिक आहे. तो असें ह्मणतो की, “सुमारें चार वर्षां- मागें, एके दिवशी एका कोळपानें माझे दिवाणखान्या- च्या एका कोपऱ्यास एक जाळे बांधिलें. तें, माझ्या झाडणाऱ्या मोलकरणीनें दोन वेळा झाडून टाकिलें. तरी पुनः त्यानें तें तसें विणिलें. तेव्हां तें झाडून टाकूं नको, असें मी तिला सांगितलें. तें करण्यास तो दोन दिवस खपत होता. तें पूर्ण झालें तेव्हां त्याला मोठी हुशारी आली, असें त्याच्या चालचर्येवरून मला स्पष्ट दिसून भालें. त्या जाळयांत त्याला जी पहिली शिकार सांपडली, ती त्याच्याच जातीच्या प्राण्याची होती. तो कोळी, ह्या माझ्या कोळ्यापेक्षां शरीराने मोठा होता; परंतु व्याजमधी ल घर बांधण्याचें सर्व द्रव्य सरून जाऊन त्यास राहा- पास थारा नाहींसा झाल्या मुळें, तो ह्या कोळ्याच्या जाळ्पा- वर हल्ला करण्यास आला होता.तो तेथें प्राप्त होतांच त्यांत, माझा कोळी हटेल, दोघांचें युद्ध सुरू झालें. भसें मला प्रथमतः वाटलें. कारण, तो आपल्या शत्रू- शीं भमळसा लढून लागलाच आपल्या जाळ्याच्या भोंकां- त परत येऊन बसे... त्यानें बाहेर येऊन समोर लढावें, ह्यासाठी दुसऱ्या कोळ्यानें होतेतितके इलाज करून पाहिले. पण हा आपल्या किल्ल्याच्या अगदीं बाहेर असा पडला नाहीं. तेव्हां शत्रूनें मझ्या कोळ्याचें