पान:मधुमक्षिका.pdf/१८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १७० )

वांचून राहात नाहीं. त्याचे पाय लांब असून त्यांच्या शेवटीं नखे असतात. तेणें करून त्याच्या कीटकशत्रूंस त्याजवर एकाएकी चाल करवत नाहीं. त्याला डोळे पुष्कळ असून ते नखासारख्या कांहीं क ठिण पदार्थाने आच्छादिलेले असतात. तरी त्याला कमी दिसतें असें नाहीं. कां कीं, तें आच्छादन पूर्ण पारदर्शक आहे. ह्याशिवाय त्याला त्याच्या तोंडाच्या पुढच्या अंगास एक चिमटा असतो; त्यानें त्याला आपलें भक्ष्य धरितां, मारितां व जाळ्यांत आणून ठेवि- तां येतें. अशी त्याची युद्धसामग्री आहे.
 दुसऱ्या कीटकांस पकडण्याचें त्याचें बळकट साधन टले झणजे जाळे होय. तें उत्कृष्ट करण्यासाठीं तो फार मेहनत घेतो. त्याच्या शरीरामध्यें परमेश्वरानें कांहीं एक चिकटसर पदार्थ ठेविला आहे; तो आपल्या पश्चिमद्वारावाटे तो काढितो; आणि ज्या प्रकारचें जाळें विणण्याची त्याची इच्छा असते, त्याप्रमाणे जाड किंवा बारीक त्याचे धागे तो काढितो. पहिला धागा भिंतीला किंवा तशा दुसऱ्या कोणत्या पदार्थाला तो आरंभी चिक- टवितो; तो तेथून कधीही सुटू नये ह्मणून त्यावर तो आपला चीक घालून फार बंदोबस्त करितो; नंतर त्या धाग्याचें दुसरें ठोंक जेथे चिकटवावयाचे असेल, तेथें तो जातो; तोपर्यंत तो दोरा तसाच त्याच्या पोटांतून निघत असतो. ह्या दुसऱ्या ठिकाणी गेल्यावर तो धागा चांगला ताठ राहील, अशा मजबुदीनें तो तेथें अडक- वितो. आणि ह्याप्रमाणें सर्व धागे आडवे उभै वि सर्व जाळे तयार करतो. ते धागे अगदी ताजे व ओल-