पान:मधुमक्षिका.pdf/१७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १६९ )

पणाचे नवल वाटतें. परंतु, तोच त्याच्या कळपांतू- न काढून मनुष्यांनी आपणांत आणिला, ह्मणजे अगदी निर्बुद्ध आणि आळशी असा होतो. बीबराचेंही तसें- च आहे. तो आपल्या कळपांत स्वच्छंद असला णजे जसा काय पटाईत गौंडीच, तसें आपलें घर बांधितो तोच मनुष्यानें पकडून आणिला ह्मणजे तो केवळ वेडा होतो, जणु काय मनुष्याच्या सहवासानें त्या- ची अक्कल गुंग होते.
 कृमिकीटकादिकांमध्येंही ह्याप्रमाणेंच आहे. मुंग्या आणि मधमाशा ह्या पराकाष्ठेच्या उद्योगी अस तात, असें सर्वांस माहीत आहे. पण उद्योगी केव्हां ? त्या आपल्या मंडळींत असतात तेव्हां त्यांचा थवा फोडून त्या वेगळ्या ठेवा. ह्मणजे त्यांचें शाहाणपण व उद्योग कोणीकडच्या कोणीकडेच जाऊन, त्या अन्न- अन्न करून मरतील.
 हा कीटकादिकांचा नियम कोळपास लागू नाहीं. तो एकटा असला तरी इतक्या चतुराईचीं कामें करितो, कीं तीं सांगितलीं असतां खरी देखील वाटावयाचीं नाहींत. ह्या कीटकानें, केवळ परक्यांशींच नव्हे, तर आपल्या जातीच्या प्राण्यांशींही भांडून झगडून आपले रक्षण करावें, अशा संकेतानें त्याची शरीर- रचना परमेश्वरानें केली आहे. त्याचे डोके आणि छाती ह्यांजवरील कातडी इतकी भक्कम असते कीं, तीत कोणत्याही कीटकाची नागी शिरावयाची नाहीं. आणि . त्याच्या पोटाची कातडी इतकी सुळसुळीत असते कीं, कोणाचीही नांगी तिजवरून सुळकर निघून गेल्पा
१५