पान:मधुमक्षिका.pdf/१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(८)


ह्या विषयांवरील उदाहरणांच्या सवईनें चित्ताची एकाग्र तो पुनः स्थापित होते. कोणत्याही गोष्टीचा अगदीं सूक्ष्मरीतीने विचार करता यावा, व तिच्या सिद्धतेस नानाविध प्रमाणे देण्याची शक्ति आपणास प्राप्त व्हावी, अशी ज्याची इच्छा असेल, त्याने मोठमोठ्या न्यायस- भांत ठरलेले फैसले, त्यांतील विद्वान वकिलांच्या भाषणा- सहित पाहावे; ह्मणजे त्याची इच्छा पूर्ण होईल. असे अनेक मनोव्याधींवर अनेक उपाय सांगितले आहेत.


विश्व.

 प्राचीन काळी जे अति विख्यात पुरुष होऊन गेले, त्यांनी आपली कीर्ति मागे राहावी, ह्मणून कितीएक मोठमोठीं कृत्यें करून ठेविली आहेत. तीं पाहून अ.प णास त्यांचें स्मरण होतें, व त्यांचे मोठेपण आपले मनांत येतें. जो जो कोणी मुशाफर आग्राशहरी जातो, तो तो तेथला प्रख्यात ताजमहाल पाहिल्यावांचून बहुत- करून तेथून निघत नाहीं. ती इमारत पाहातांक्षणींच तो अत्यंत आनंद पावतो आणि ती सारी पाहाण्यापूर्वीच ती बांधावेणाऱ्याची हकीकत विचारण्याची त्याला इच्छा होते. तेव्हां तेथें सहजच शाहाजहान बादशाहाचें नांव निघतें. आतां विश्वरचनेच्या मानाने पाहिलें असतां, तें काम, खंडीस रती अथवा सिंधूस बिंदु, ह्या- पेक्षां देखील कमी मानाचें आहे. परंतु, मनुष्याचे मन सृष्टिरचनेकडे न लागतां, अशा क्षुल्लक पदार्थांकडे ला गतें, ह्याचें कारण काय, असे कोणी विचारील, तर त्या । ला उत्तर हेंच कीं, पदार्थांतील चमत्कारिकपणा मनु-