पान:मधुमक्षिका.pdf/१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(९)

व्याचें चित्त बेधीत नाहीं; तर ज्या गुणावरून त्याचें लक्ष बस्तूकडे लागतें, तो गुण नवेपणा होय.. ह्या सृष्टीम- ध्यें, नेहमीं डोळ्यांपुढे असणारा, अति तेजःपुंज, आणि चित्तवेधक, असा पदार्थ, विचारांती पाहूं गेलें असतां, सू- यांसारखा दुसरा नाहीं. पण, त्याविषयों कधीं कोणी आश्चर्यभरित होऊन कांहीं विचारीत नाहीं. ह्याचें कारण काय ? ह्याचें कारण हेंच की, तो नेहमीं पाहा- ण्यांत येतो ह्मणून. एरवीं त्यास एकीकडे ठेवून ता- जमहालाची विचारपूस लोक करितात, ह्यावरून त्यापे- क्षां ताजमहाल अधिक चमत्कारिक झाला, असें नाहीं.
 ताजमहालासारख्या इमारती पाहून जर आपणास इतका अचंबा वाटतो, तर, ह्या विश्वाचा अवाढव्य वि स्तार मनांत आणिला असतां आपण केवढ्या चमत्कार- सागरांत बुडून जाऊं बरें. ? विश्वविस्ताराची कल्पना मनांत येणें मनुष्यास अशक्य आहे. पहा. आमचा हा तेजस्वी दिनकर, आपल्या ग्रहमालेसुद्धां लटला तरी, सर्व विश्वाचा अत्यल्पांश होय. हा संबंद नाहीसा झा ला तर, दाहा खंडी वाजरीतून एक दाणा गेल्या इतकी देखील त्याची दाद विश्वांत लागावयाची नाहीं. विश्वा च्या तुलनेनें पाहिला असतां हा रवि, ग्रहमालेसह जरी- इतका क्षुल्लक वाटतो, तरी त्या विषयींची देखील कल्पना मनांत आणायास कठीण पडते. पाहा. विद्वान लोक आपणास सांगतात कीं, सूर्य हा ग्रहमालेचा मध्य होय; त्याचें उदरसूत्र ८८३२४६ मैल आहे; व तो २५ दिवस, १४ तास, आणि ८ मिनितें, इतक्या काळांत आपले आं साभोवती फिरतो. त्याचे अगदी जवळचा ग्रह बुध;