पान:मधुमक्षिका.pdf/१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ७ )


असतां जसे गोड व सुरस लागतात, तशी त्यांची भाषां- तरें, कितीही चातुर्य खर्चून केलेली असली, तरी मधुर लागत नाहींत.
 पुष्कळ ग्रंथावलोकनानें मनुष्य बहुश्रुत होतो. वारं- वार वादप्रतिवाद करीत असल्यानें अंगीं समयसूचकता येते. आणि कोणताही विषय हातून अनेक वेळा लिहिला गेला, ह्मणजे तो मनांत बरोबर ठसतो, व ध्यानांत चांगला राहातो. इतिहासाच्या अभ्यासानें मनुष्य शाहाणा आणि दूरदृष्टि होतो; काव्याच्या अ भ्यासानें रसिकता प्राप्त होते; गणिताच्या अभ्यासानें कावेबाजपणा वाढतो; पदार्थविज्ञानानें सूक्ष्मदृष्टि येते, व पाताळयंत्रीपणा वृद्धि पावतो; धर्मशास्त्र व नीतिशास्त्र ह्यांनी बुद्धिगांभीर्य, वनेमस्तपणा ही येतात; आणि तर्कशास्त्र व पांडित्यकला, यांहींकरून वादविवाद कर ण्याचें सामर्थ्य मनुष्यास प्राप्त होतें. असे निरनिरा- ळ्या विषयांचे निरनिराळे उपयोग आहेत. शारीररो. गांस जसे कांहीं नियमित उपाय असतात, तसे मानसि- क रोगांसही विद्वानांनीं कांहीं उपाय शोधून काढले आहेत. मन स्थिरता पावून कोणत्याही एका गोष्टीकडे लागेना, तर भूमितीचा अभ्यास करावा. त्यांत असें असतें कीं, कोणत्याही एका सिद्धांताची सिद्धता खरी करून दाखविण्यास आरंभिल्यावर ती, आतां अर्धीमुर्धी करूं आणि राहिलेली मग करूं, असें ह्मणून चालत नाहीं; एका बैठकीस आरंभून शेवटास नेली पाहिजे. आणि ती अर्धवट सोडिली तर पहिले श्रम व्यर्थ जाऊन पुनः पहिल्यापासून आरंभ करावा लागतो. ह्मणून